अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ एप्रिल ते ८ एप्रिल २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. खरेदीसाठीही काळ अनुकूल आहे. संततीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला फायदा मिळेल. जे विद्यार्थी परदेशात शिकायला आहेत त्यांना हा विशेष यशाचा काळ आहे. मात्र या कालावधीत मेष राशिच्या लोकांनी कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता जरुर घ्यावी. सप्ताह मध्य वकील, नेते, फ़ार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना तसेच नोकरीबदल करायची इच्छा असेलेल्यांना हा कालावधी अनुकूल आहे. तब्येतीची मात्र या दरम्यान काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल किंवा त्याचा उत्कर्ष या काळात शक्य.
उपासना: या काळात कुलदेवतेची उपासना करावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी देवीचे पाठ करुन घ्यावेत.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात सूर्य, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. एखाद्या पार्टी किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग आहेत. अपेक्षित भेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. संततीसाठी काही खर्च करावा लागेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी मात्र या काळात अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच थेरपिस्ट, आहारतज्ञ तसेच फिजिकल फिटनेसशी संबंधीत असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: रामरक्षेचे पठण या काळात रोज करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून आणि लाभस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. लांबच्या प्रवासाचे योग मनात घोळत रहातील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. प्रॉपर्टीच्या कामांमधे फ़ायदा संभवतो. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिंकांना काळ अनुकूल आहे. छान खरेदी होईल. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, दशमस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस सोडल्यास सप्ताह उत्तम आहे. रविवारी ग्रहमान प्रतिकूल आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काही चिंता मनाला भेडसावत असतील. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरतील. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे. उपासनेत मन रमेल. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. मास मिडिया मार्केटींगचे काम करणारे लोक, लेखक, ब्लॉगर्स, संशोधक यांना भरीव कामगिरीची संधी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. मौज-मजेचे प्रसंग घडतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारांमधून लाभ मिळू शकतील. वरीष्ठ तुमच्यावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता त्यांच्याकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा मोबदला मिळेल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. अध्यात्म, ज्योतिषशास्त्र, मृत्युनंतरचे जीवन अशा गूढ गोष्टींकडे तुमचे मन आकृष्ट होईल. संशोधक, गुप्तहेर, पोलिस यांना बर्याच काळापासून रेंगाळलेल्या एखाद्या कामामध्ये अचानकपणे यश मिळेल. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. काहींना धनलाभाचे योग संभवतात. संभाषणचातुर्याने कामे मार्गी लागतील. वक्ते व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रवासाचे योग आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आवडती माणसे भेटण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची होण्याची शक्यता आहे. काही खर्च अचानक समोर येण्याची शक्यता आहे. बेकायदा असलेली कामे करु नका. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. परदेशाशी ज्यांचे व्यवहारीक संबंध आहेत त्यांना काही फायदा देंणार्या संधी चालून येऊ शकतील. सप्ताह मध्य व त्यानंतरचा काळ फारसा चांगला नाही. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. वाहनांची कागदपत्रे व्यवस्थित आहेत ना याची खातरजमा करुन घ्या. सप्ताह अखेर आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल आणि नवमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. धनलाभ होण्याचे योग आहेत. मात्र एखाद्या मित्राचा किंवा परीचिताचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. तब्येतीसंबंधी काही कुरबुरी या कालावधीत शक्य. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा होईल. परदेशाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. छान खरेदी होऊ शकेल. तुमच्या जोडीदाराला एखादी छानशी भेटवस्तू देऊन आनंदी कराल. मनोरंजनाकडे कल राहील. अध्यात्मिक उन्नतीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसायिक भेटीगाठी यशस्वी होतील. कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, षष्ठस्थानी बुध, शुक्र, राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मन प्रसन्न असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. धनलाभ होईल. मात्र लोकांचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करतांना योग्य ती काळजी घ्यावी. संशोधक, विमा व्यावसायिक, खाजगी गुप्तहेर यांना हाच काळ चांगला फायदा मिळवून देणारा ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवट छान खरेदीचा ठरु शकेल. नृत्यकलेशी संबंधीतांना यश देणारा कालावधी ठरेल. आयात-निर्यात करणार्या व्यापारांना एखाद्या व्यवहारातून मोठा फायदा मिळू शकेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, पंचमस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. मित्रांच्या भेटी शक्य. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही होतील. तुमचं कौतुक होईल. एखादी भेटवस्तु किंवा चांगल्या कामाची पावती तुम्हाला या काळात मिळू शकेल. तमच्या मुलांच्याबाबतीतही काही चांगल्या गोष्ठी घडण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक काही लाभदायक घटना घडतील. अंत:स्फूर्तीने तुम्हाला भविष्यकाळातील काही संकेत यादरम्यान मिळण्याची शक्यता आहे. संशोधनकार्य, डेटा प्रोसेसिंग, डेटा रिकन्सलिएशन, सर्जन, मानसोपचारतज्ञ यांना फायदेशीर काळ आहे. जोखीम असलेली कामे मात्र या काळात टाळा. सप्ताह मध्यात धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. ध्यानधारणा/ Meditation या काळात मनाला शांती मिळवून देतील. नोकरदारांनी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाचा शेवट छान असेल. मनासारखं काम घडेल. प्रमोशन/ पगारवाढ/ बदली यासाठी वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. काही लाभही या काळात शक्य. विद्यार्थी व कलाकारांना उत्तम यशाची ग्वाही देणारा काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी बुध, शुक्र, राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी, सर्जन तसेच मानसशास्त्राशी संबंधीतांना चांगला काळ आहे. काही लाभही या काळात संभवतात. मात्र काहींना मनसिक ताण जाणवेल. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती उत्तम आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य. प्रवासाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोशल मिडियावर तुम्हाला लोकांचे चांगले प्रोत्साहन मिळू शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, धनस्थानात बुध, शुक्र, राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी प्रतियोग होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि ८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीच्या शोधात असणार्यांना तसेच नोकरी बदलू इच्छिणार्यांसाठी काही संधी चालून येतील. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीची मात्र या दरम्यान काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याचे ही योग आहेत. सप्ताह अखेर अचानक धनलाभाची असू शकेल. विमा, मानसोपचारतज्ञ या क्षेत्रात काम करणार्यांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: गणपतीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)