अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, शनि आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. मात्र असे असले तरी वरीष्ठ तुमच्या चुका शोधण्याचाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर सध्या काही दिवस थांबावे. सप्ताहाच्या मध्यात काही चांगल्या घटना घडतील. धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटी शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर छान खरेदीचे योग आहेत. ध्यानधारणा/ मेडिटेशन, हटयोग किंवा इतर मार्गाने पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना काही चांगले अनुभव येतील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, शनि लाभस्थानात गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. घरातील वडीलधारी मंडळींचं सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. धातूसंबंधी किंवा बांधकामासंबंधी व्यवसाय करणार्यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. आवडत्या लोकांच्या सांनिध्यात वेळ छान जाईल. मित्राच्या मदतीने एखादे काम मार्गी लागू शकेल. शनिवारी जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, शनि, दशमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात त्रासाची व कंटाळवाणी असण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. निराशावादी विचार मनात येतील. पण काळजी करु नका ही ग्रहस्थिती तात्पुरती आहे. सप्ताह मध्यात नित्योपासना किंवा धार्मिक गोष्टींमधून मनाला शांतता मिळेल. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. मित्रांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या शेवटी पैशांची कामे लांबण्याची शक्यता आहे.
उपासना: दत्तगुरुंची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, शनि, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे. सप्ताह मध्यात जोखीम असलेली कामे करु नका. ज्योतिषशास्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करत असलेल्यांची मात्र या काळात चांगली प्रगती होईल. सप्ताह मध्यानंतर भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवास आनंददायी/ फयदेशीर ठरतील. सप्ताहाचा शेवट आवडत्या व्यक्तींची भेट घडवून आणू शकेल. काही लाभही यादरम्यान होण्याची शक्यता आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात बुध, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, शनि, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. कोर्ट-कचेरीचे काही व्यवहार प्रलंबीत असतील तर शक्यतो पुढची तारीख घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांना मात्र हाच कालावधी चांगला फायदेशीर ठरणार आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. अनपेक्षितपणे एखादी फायदेशीर घटना शक्य. मात्र पैशांची जोखीम ज्यात असेल असे व्यवहार टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रातील तुमची उर्जा वाखाणण्याजोगी असेल.आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात बुध, प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, शनि, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला जाणार आहे. त्यानंतरचे २ दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र हा कालावधी नोकरीबदलासाठी चांगला आहे. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. वकीलांना हा काळ अनुकूल आहे. फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. मन प्रसन्न राहील. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. वाहने जपून चालवावीत. बेकायदा व्यवहार टाळा. मात्र हाच कालावधी सर्जन व विम्यासंबंधी काम करणार्यांना चांगला ठरणार आहे.
उपासना: स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात बुध, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, शनि, षष्ठस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात अनुकूलतेने होणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल. घरासंबंधी काही दुरुस्ती/ आवराआवरी बरेच दिवस रेंगाळली असेल तर त्यासाठी वेळ काढाल. सप्ताहाचा मध्य लाभदायक आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. आहारतज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना चांगला काळ आहे. तब्येतीची काळजी मात्र या काळात घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी बुध, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, शनि, पंचमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- आठवडा छान असणार आहे. आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. लेखक/ ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील मात्र प्रॉपर्टीची कागदपत्रे तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावीत. सप्ताह मध्यात घरात चांगले वातावरण असेल. एखादा धनलाभ संभवतो. संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. कमी श्रमात जास्त यश संभवते. आपल्या छंदाला य काळात जरुर वेळ द्या. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. आरोग्याच्या काही समस्या मात्र या काळात जाणवतील. डोकेदुखी, मायग्रेन/ अॅसिडिटी किंवा पोटाच्या काही व्याधी असतील तर विशेष काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, शनि, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- हा पूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाची सुरूवात चागल्या घटनांची असेल. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्यात प्रिय व्यक्ती भेटतील. काही छान लाभ होतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. प्रवासाचे योग येतील. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. काही लाभ शक्य.
उपासना: गजानन महाराज/ स्वामी समर्थ अशा संतांची चरित्रे/ पोथी वाचणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, प्लूटो, धनस्थानात सूर्य, शनि, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांचा/ शेजार्यांचा छान अनुभव येईल. लेखक, प्रकाशक, साहित्यिक यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्यातील कलागुणांना छान वाव मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शनि, धनस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला खरेदीसाठी चांगला काळ आहे. एखादा अनावश्यक खर्चही करावा लागू शकतो. कुठल्यातरी गोष्टींची हुरहुर किंवा चिंता विनाकारण वाटत राहील. परदेशाशी ज्यांचे व्यवहार असतील त्यांना तसेच कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधित व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात बुध, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेस चंद्राची सूर्य व शनिबरोबर युती होईल. २२ तारखेला चंद्राची गुरु व शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक काळ आहे. धनलाभाची शक्यता आहे. मित्र भेटतील. सप्ताह मध्यात ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे अशा लोकांना हा काळ विशेष चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना काही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने मनाजोगती खरेदी कराल. धार्मिक गोष्टींसाठीही काही खर्च होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सप्ताह अखेर कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. एखादा धनलाभ शक्य आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)