अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामील होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा विकायची असेल त्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. ज्यांचं काम संशोधन, इतिहास, मानसशास्त्र, रेकी अशा विषयांशी आहे त्यांना मात्र हाच कालावधी चांगला ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यकारक घटना शक्य. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग संभवतात. मात्र या काळात तब्येतीकडे दुर्लक्ष नको.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. कलाकार, कवी, लेखक, ब्लॉगर्स तसेच साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. याकाळात काहीतरी छान काम होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही योग काहींना संभवतात. काही अध्यात्मिक अनुभव या काळात शक्य. सप्ताह मध्य बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल आहे. घरातील वातावरण चांगले असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. गायकांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात व नंतर मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आत्मविश्वास वाढलेला असेल. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. वैहाहिक सौख्य मिळेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना व कलाकारांना उत्तम काळ आहे. लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी दुपारपर्यंत कामात अडचणी जाणवतील. आपल्या चीजवस्तू सांभाळा. अचानक काही खर्चही या काळात उद्भवू शकतील. त्यानंतर मंगळ्वार रात्रीपर्यंतचा कालावधी चांगला आहे. मन आनंदी राहील. नशीबाची साथ मिळेल. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. सप्ताह मध्यात काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. घरात छान वातावरण असेल. तुमच्या संभाषण चातुर्याने कामे मार्गी लावाल. हॉटेल व्यावसायिक, गायक, ज्वेलर्स, ब्युटीशिअन्स तसेच सलूनवाले यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताह अखेरीस संमिश्र कालावधी आहे. तुमचे आरोग्य सांभाळा. वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव शक्य.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात आत्मविश्वास वाढविणारं ग्रहमान आहे. मनासारखं काम होईल. वरीष्ठ खुश असतील. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. आवडत्या पदार्थांवर ताव माराल. एखादा पदार्थ स्वत:ही बनवून बघायला हरकत नाही.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा गोष्टींपासून मात्र या काळात लांब रहा. कायद्याचं पालन करा. सप्ताहाचा शेवट छान होणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते आता मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी बुध, शुक्र, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने ते खूष असतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनुकूल काळ आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित भेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. खर्च वाढतील मात्र पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे.
उपासना: या काळात रोज सूर्याला अर्ध्य देणे श्रेयस्कर राहील.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात बुध, शुक्र, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात अनुकूल ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम काळ आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मजेत वेळ व्यतीत होईल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या पार पडतील.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ(व), लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने जपून चालवा. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. न्यायसंस्था तसेच शिक्षणसंस्थेच्या संबंधीत लोकांना चांगला काळ आहे. बेकायदा गोष्टी या दरम्यान टाळाव्यात. अचानक काही खर्च या काळात उद्भवू शकतात. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान अनुकूल होणार आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी दुपारपर्यंतचा काळ तितकासा अनुकूल नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. कलाकारांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. त्यानंतरचे दोन दिवस आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनासुध्दा चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मात्र याच्या बरोबर उलट काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य. अचानक पगारवाढ किंवा पदोन्नतीचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गोष्टीत मन रमेल. परदेशगमन किंवा त्यासंबंधी करावयाच्या गोष्टींसाठी ग्रहांची अनुकूलता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ(व), भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी दुपारपर्यंतचा काळ उत्तम असेल. लाभदायक घटना शक्य. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र असणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना हा कालावधी चांगला जाईल. मात्र या दरम्यान आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताह मध्यात आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदरीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना अचानक लाभाचे योग शक्य.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध, शुक्र, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १२ तारखेला सूर्याचा शनिशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १५ चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग होईल. १६ तारखेला सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध व शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सप्ताहाच्या शेवटी मनाला आनंद देणार्या घटनांचा काळ असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनाही अनुकूल काळ आहे. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)