अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), सप्तमस्थानात सूर्य, बुध, केतू, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येऊ शकतील. प्रेमी जिवांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. साहित्यिकांसाठी व कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. छान प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यात घरासाठी वेळ काढावा लागेल. घरातील वातावरण छान असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. शनिवारी तब्येतीची काळाजी घ्यावी.
उपासना: या काळात रोज सूर्याला अर्ध्य देणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ(व), षष्ठस्थानात सूर्य, बुध, केतू, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील चीजवस्तू सांभाळा. सप्ताहाच्या अखेरीस कलाकारांना व विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यात चांगली प्रगती दिसेल.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ(व), पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- पूर्ण सप्ताह चांगला आहे. घरात छान वातावरण असेल. कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. विवाहेच्छूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामातून लाभ संभवतात. प्रेमिकांना हा सप्ताह विशेष चांगला आहे. नविन विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करण्यासाठीही अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभाचे अचानक आलेले योग सुखावून टाकतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी सप्ताहाची सुरूवात जास्त अनुकूल आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, बुध, केतू, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान खरेदीने होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. धार्मिक कार्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण काळ छान आहे. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर व आनंददायक ठरतील.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, केतू, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घराच्या देखभालीसाठी किंवा सजावटीकडे लक्ष द्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा किंवा काही अनपेक्षित खर्चाचा योग आहेत. सप्ताह मध्यानंतर आपले काही छंद असतील तर त्यासाठी किंवा नविन विषयांचा अभ्यास करण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. ज्योतिष किंवा त्यासारख्या गूढ विषयांमधे रुची निर्माण होऊ शकेल. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, केतू, तृतीयस्थानी शुक्र, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहात चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यालयीन कामासाठी प्रवास करावा लागू शकेल. सप्ताह मध्यात एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभागी व्हाल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धनलाभ होतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताह अखेरीस एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, केतू, धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. धनलाभाचे योग आहेत. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईच्या भेटीची शक्यता आहे. वेळ मजेत जाईल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करु नका. अन्यथा कायदेशीर कटकटी उद्भवू शकतात.
उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. मात्र हा कालावधी विमा क्षेत्रात काम करणारे तसेच ज्योतिषी यांना अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने खुश असाल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत. मात्र एखाद्या मित्राला अचानक काही मदत करावी लागेल. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व), लाभस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान खरेदीचा मूड असेल. सोमवार व मंगळवार काहींना त्रासदायक व अडचणींचे असू शकतात. मात्र गूढ विषयांचा अभ्यास किंवा पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची असेल त्यांना हा काळ अनुकूलच ठरणार आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. आर्थिक लाभ शक्य. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आप्तेष्टांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ(व), दशमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), भाग्यस्थानात सूर्य, बुध, केतू, दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवावीत. प्रवासात अडथळे येतील. गुरुजनांशी वाद टाळावेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ(व), अष्टमस्थानात सूर्य, बुध, केतू, भाग्यस्थानात शुक्र, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुध-मंगळ षडाष्टक होईल, वक्री मंगळ वृषभ राशित तर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. १४ तारखेला गुरु-चंद्र नवपंचम होईल. १५ तारखेला सूर्य-मंगळ षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल आणि सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी व्हाल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)