अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस खर्च वाढवणारा असेल. काही चिंताही असतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमवाल. सोमवार आणि मंगळवारी रागावर नियंत्रण ठेवा. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग संभवतात. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक योग आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम हॊईल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. मित्रांशी किंवा आप्तेष्टांशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ संमिश्र असणार आहे. खर्च वाढतील. काही मनाविरुध्द घटना संभवतात. मात्र काहींना जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होऊ शकेल. सप्ताह मध्यात व नंतर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडू शकतात. कुटूंबीयांसमवेत वेळ छान जाणार आहे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम झाल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. वरीष्ठ आपल्यावर खुष असणार आहेत. मित्र भॆटतील. काही मानसन्मान किंवा लाभही अपेक्षित आहेत. सप्ताह मध्यात मनासारख्या खरेदीचे योग आहेत. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नशीबाची चांगली साथ मिळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. नशिबाची साथ मिळेल. नंतरचे दोन दिवस थोडेसे प्रतिकूल आहेत. आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. वडीलधारी व्यक्तींशी तसेच कार्यक्षेत्रातील वरीष्ठांशी वाद टाळावेत. आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना मात्र काही चांगल्या बातम्या कळतील. सप्ताह मध्यात व नंतर लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. घरात छान वातावरण असेल. मित्रांशी किंवा आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस थोडा प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. धार्मिक गोष्टींसाठी किंवा उपासनेसाठी चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. कलेच्या क्षेत्रातील लोकांना विशेष चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही प्रतिकूल प्रसंग घडतील. प्रवासात काळजी घ्या. शिक्षण क्षेत्रातील लोक तसेच सर्जन/ थेरपिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही लाभदायक घटना घडू शकतात. धनलाभ होईल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या छंदामध्ये वेळ छान जाईल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी तब्येतीची काळजी घ्यावी. त्यानंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी काळेल. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी आपल्या भागीदाराला न सांगता किंवा विश्वासात न घेता केलेली गोष्ट नुकसानीची ठरु शकेल. सप्ताह मध्यात संमिश्र योग आहेत. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी राहील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. मन प्रसन्न असेल. त्यानंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी/ पोटाच्या काही तक्रारी असतील तर विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना मात्र हा काळ अतिशय लाभदायक असेल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. हाच काळ खरेदीसाठी मात्र काळ चांगला आहे. आपल्या जोडीदाराला एखादं छानशी भॆटवस्तू देऊन खूश करु शकाल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काळ चांगला आहे. रविवारी घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. त्यानंतरचे दोन दिवस संततीसौख्याचे आहेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. वकील, आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. आरोग्याच्या काही समस्या असतील तर मात्र तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. भावंडांबाबत चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. वडीलधारी मंडळींचं मार्गदर्शन लाभेल. तुमच्या कलेचे कौतुक होईल. सोमवारचा दिवस प्रतिकूल ठरु शकतो. कोणाशीही वाद होऊ देऊ नका. आपले आरोग्य जपा. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत उत्तम काळ आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश– चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी झालेला संपर्क आनंददायक ठरेल. लेखकांना ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. खेळाडू तसेच कलाकार छान प्रगती करतील. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. सप्ताहाच्या शेवटी प्रवसासाठी अनुकूल ग्रहमान आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तसेच धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस सुखाचा ठरु शकेल. मन आनंदी राहील. नशिबाची साथ मिळेल. त्यानंतर बुधवार दुपारपर्यंतचा काळ उत्तम असेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. लोकांचे विचित्र अनुभव शक्य. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवासात काळजी घ्यावी. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. अती दगदग टाळावी.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)