अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत. सप्ताह मध्य धार्मिक कृत्ये किंवा उपासना करण्यासाठी चांगला आहे. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या कालावधीत काही दैवी अनुभव शक्य. काहींना प्रवासयोग येतील. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा रुबाब वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील.
उपासना: या कालावधीत रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी व सोमवारी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी या काळात घ्यायला हवी. मंगळवार व बुधवार हे दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवा. जोखीम असलेले व्यवहार टाळावेत. काहींना मात्र याच काळात अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, सर्जन तसेच विमा व्यावसायिक या लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. तुमचे कोणी गुरु असतील किंवा गॉड फादर असतील तर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने एखादे काम पटकन होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी बुध पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि लाभस्थानात मंगळ, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या आरोग्याबाबत काही तक्रारी जाणवतील ज्यांना ॲसिडीटी किंवा पोटाचे काही व्याधी असतील तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा अनुभव या काळात येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान जाणार आहे. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ विशेष चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम असलेले व्यवहार टाळा. वाहने जपून चालवा. तसेच घरातील वडीलधारी मंडळी किंवा कार्यक्षेत्रातील वरीष्ठांशी वाद घालू नका. आपली धार्मिक मते दुसऱ्यांवर लादू नका.
उपासना: या काळात रोज श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र जपावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानात बुध, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून आणि दशमस्थानात मंगळ, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चंगली होणार आहे. काही लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र वरीष्ठांशी जमवून घ्यावे लागेल. वरीष्ठांशी वाद किंवा विरोध दीर्घकालीन नुकसान देणारा ठरु शकेल. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. आरोग्याची काळजी मात्र या काळात घ्यायला हवी. विशेषत: मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी या काळात सांभाळणे गरजेचे आहे. फार्मासिस्ट, आहारतज्ञ व इतर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आवडत्या मंडळींबरोबर वेळ छान घालवता येईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद नको. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर दुर्लक्ष करु नका.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. प्रवासयोग येऊ शकातील मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. सीआयडी, सीबीआय, ईडीमध्ये काम करणारे लोक, खाजगी गुप्तहेर, पुराणवस्तू संशोधन, मूर्तीशास्त्र किंवा इतर गूढ विषयांशी संबंधीत लोक या काळात चर्चेत रहातील. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताह मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. विशेषतः वाताचे विकार किंवा हाडांसंबंधी काही दुखणे असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद घालू नका.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध संशोधन क्षेत्राशी आहे त्यांना मात्र ग्रहांची अनुकूलता आहे. सप्ताह मध्यात एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. वैहाहिक सौख्य मिळेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. घराची दुरुस्ती किवा सजावट करायची असेल तर त्यासाठी वेळ काढा. सप्ताह मध्यानंतर नशिबाची साथ चांगली लाभणार आहे कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, शुक्र आणि लाभस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. मात्र सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. तब्येतीच्या काही तक्रारी जाणवत रहातील. सप्ताह मध्यानंतर हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना चांगला काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, राहू, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही मनाविरुध्द प्रसंग घडणे शक्य आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. मायग्रेन किंवा अॅसिडीटी असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. आंबट पदार्थ खाणे व जागरण या काळात टाळा. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. मन आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर भावंडांची खुशाली कळेल. काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात मंगळ, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. सोमवारी जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. सप्ताहाच्या मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. धनलाभ होईल. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांची खुशाली कळेल. प्रवासाचे योगही संभवतात.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मात्र कोणाशीही वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सोमवारी प्रॉपर्टीची कामे शक्यतो टाळा. सप्ताहाच्या मध्यात अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. प्रवासयोग शक्य. परदेशाशी संबंधीत असलेली कामे चांगल्या पध्दतीने पार पाडाल. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील. आत्मविश्वास वाढेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, राहू, हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने ते खूष असतील. मात्र सोमवारी कागदपत्रांशी संबंधीत कामांमध्ये चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. तसेच वाहने जपून चालवा. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतरचा काळ खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, धनस्थानात मंगळ, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू आणि लाभस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला मंगळ-शनि केंद्रयोग व चंद्र-गुरु नवपंचम योग होईल. ८ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १० तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग होईल व मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल. ११ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सूर्य प्रतियोग व चंद्र-शनि युती होईल. १३ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काही लाभही या काळात संभवतात. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसायिकांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—-अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)