अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ जून ते २५ जून २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, राहू, धनस्थानात बुध, शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग येऊ शकतील. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये मन रमेल. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असणारे व नृत्यकलेशी संबंधित असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, शुक्र, धनस्थानात सूर्य, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात मंगळ, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात भाग्यवृध्दी करणारे योग येतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्र व कायद्याच्या क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींचे सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. बेकायदा व्यवहारापासून मात्र लांब रहा. काही खर्च अचानक समोर येतील. सप्ताहाच्या अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल, राहू आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाचे पहिले दोन दिवस संमिश्र आहेत. कोणतीही जोखीम घेणे या काळात महागाचे ठरू शकेल. वाहने जपून चालवा. कामात कुचराई किंवा दिरंगाई होऊ देऊ नका. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण असू द्या तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे कोणतेही वर्तन या काळात टाळावे. सप्ताह मध्यात हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. मित्रांच्या भेटी शक्य. सप्ताहाच्या अखेरीस खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल, राहू, लाभस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला दोन दिवस तुमच्या घरात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यानंतर सप्ताह मध्य भाग्यकारक घटनांचा असू शकेल. वरीष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. न्यायक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, राहू, दशमस्थानात बुध, शुक्र आणि लाभस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होऊ देऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी फ़ारसा चांगला नाही. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर वाहने सावकाश चालवावीत. सप्ताहाचा शेवट सुखद ठरु शकेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. छान लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात शनि(व), सप्तमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, राहू, भाग्यस्थानात बुध, शुक्र आणि दशमस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगली ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढण्याची शक्यता आहे त्याकडे दुर्लक्ष नको. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीही कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर विम्यासंबंधी कामे करणार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र या काळात वाहने हळू चालवावीत. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. काही लाभ शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
उपासना: दत्त उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. सप्ताह मध्यात जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. नोकरदार लोकांसाठी चांगला कालावधी आहे मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदारासाठीही काही खर्च करावे लागतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी आपले व्यवहार चोख ठेवावेत. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. मात्र काही गोष्टींची काळजी या काळात सतत जाणवत राहील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, राहू, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चैन, मौजमजा यांनी होऊ शकेल. मन प्रसन्न असेल. घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य खेळाडू व विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ आहे. गुंतवणूकीसाठीही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवू शकतात. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र लाभदायक कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, राहू, षष्ठस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर कमी श्रमात जास्त यश देणारा काळ आहे. मुलांबद्दल चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, राहू, पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात सूर्य आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही लाभ होऊ शकतील. घरात आनंदी वातावरण असेल. लेखक, वक्ते व कवी चांगले काम झाल्याने आनंदात असतील. सप्ताह मध्यात छान लाभ होतील. भावंडांबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ चांगला जाणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. सप्ताह मध्यानंतर एखादी सहल किंवा कार्यक्रमात भाग घ्याल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. प्रवासयोग येतील. प्रेमिकांना ग्रहमान छान आहे.
उपासना: उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, राहू, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छान खरेदी होईल किंवा अचानक काही खर्च करावे लागतील. प्रवासयोग येतील. परदेशगमनासाठी तयारी किंवा प्रवास यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग असतील. मन आनंदी असेल. छान छान पदार्थ बनवणे तसेच वेगवेगळ्या हॉटेलला भेटी देऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेणे आपल्याला मनस्वी आवडते. तसाच काहीसा अनुभव सप्ताह मध्यात येणार आहे. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. भाग्यवृध्दी करणारे योग आहेत.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, धनस्थानात हर्षल, राहू, तृतीय स्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्र-शुक्र व बुध-गुरु लाभयोग होतील. २१ तारखेला चंद्र-बुध लाभयोग व चंद्र-गुरु युती होईल. २२ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छान खरेदी होईल. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. मित्रांच्या भेटी होतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचेही योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक काळ आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवासयोग शक्य आहेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)