अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात बुध, शनि, प्लूटो आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारचा दिवस लेखकांना व कलाकारांना चांगला आहे. नंतरचे दोन दिवस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहेत. इस्टेट ब्रोकर्स, बिल्डर्स यांच्यासाठी व्यवसायवृध्दीचा हा काळ आहे. चांगले लाभ होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर एखादं अनपेक्षितणे मिळालेलं बक्षिस/ एखादी शाबासकीची थाप किंवा धनलाभ सुखावून टाकेल. आवडती माणसं भेटतील. आपल्या छंदासाठी जरुर वेळ काढा. मनाचं समाधान हेच जीवनातील खरं सुख असतं याची जाणीव होईल. सप्ताह अखेरीस आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. मात्र नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात बुध, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- आठवडा छान जाणार आहे. चागले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. छान पार्टीचा मूड असेल. गायकांना हा कालावधी खुप चांगला आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल, प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताह अखेर भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे, तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. आपले काही छंद असतील किंवा नवीन विषय शिकायचा असेल तर त्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात बुध, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारी जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. नंतरच्या दोन दिवसात एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना प्रवासयोग येऊ शकतात. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाच्या शेवटी हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. घरात वाद होणार नाही याचीसुध्दा काळजी घ्या.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात बुध, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारचा दिवस एक प्रकारची हुरहुर किंवा एखाद्या गोष्टीची चिंता वाटत राहील. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. नंतरचे दोन दिवस तुमचे मनोबल वाढविणारे ठरतील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह मध्यात प्रतिकूल ग्रहमान आहे. बोलण्यावर संयम ठेवावा. तब्येतीची काळजी घ्या. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर लेखकांना छान ग्रहमान आहे. प्रवासयोग येतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात बुध, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारी एखाद्या मित्राशी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. नंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. अध्यात्मिक मार्गातील लोकांना चांगले अनुभव येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. धनलाभाचे योग आहेत. मात्र या काळात आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. बोलतांना शब्द जपून वापरा. सर्दी किंवा घसादुखीचा किरकोळ त्रास या काळात शक्य आहे. काळजी घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, पंचमस्थानात बुध, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छान ग्रहमान आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात मनाजोगते काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आप्तेष्ठांची किंवा मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. एखादा अनपेक्षित धनलाभ सुखावून टाकेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवृध्दी करणार्या घटना शक्य आहेत. लाभदायक ग्रहमान आहे. मनासारखे काम झाल्याने वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर किंवा आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही होतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमुळे किंवा मित्रामुळे अडकलेले एखादं काम सहजगत्या होऊन जाण्याची शक्याता अहे. सप्ताह अखेर खरेदीसाठी चांगली असेल. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना काही चांगले अनुभव या काळात शक्य.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी बुध, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारी रात्रीपर्यंतचा काळ सोडल्यास सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. धार्मिक कार्यांमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मनासारखे काम होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
उपासना: गणपती स्तोत्र या काळात रोज म्हाणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, धनस्थानात बुध, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारी संध्याकाळपर्यंतचा कालावधी चांगला आहे. काही लाभ होण्याची शक्यता आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. नंतर मंगळवारी रात्रीपर्यंतचा काळ कंटाळवाणा व कटकटीचा असला तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. एखादं अचानक मिळालेलं गिफ़्ट/ बक्षिस मनाला आनंद देऊन जाईल. नवनवीन कल्पना सुचतील. सप्ताहाचा शेवट चांगला असेल. धनलाभाचे योग आहेत. घरात प्रसन्न वातावरण असेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारी नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. त्याकडे मात्र दुर्लक्ष करु नका. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य आहेत. मात्र या काळात मोठी जोखीम घेऊ नका. विमा प्रतिनिधींना हा काळ मोठे लाभ देणारा ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य. भाग्यवृध्दीचे योग आहेत. धनलाभ होतील.
उपासना: दत्तगुरुंची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात बुध, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. काही लाभही होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस आरोग्याच्या तक्रारी जाणवत रहा्ण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ किंवा इतर गूढ शास्त्रांशी संबंधीतांना कालावधी अनुकूल आहे. इऩ्शूरन्सचे काम करणार्यांनाही चांगला कालावधी आहे. जोखीम असलेली कामे मात्र या काळात टाळावीत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, लाभस्थानात बुध, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व सूर्याशी षडाष्टक होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १६ तारखेला शुक्राची मंगळाशी युती व चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व हर्षलशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी आणि शुक्राशी त्रिकोण होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. आवडती माणसे भेटतील. खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना व नोकरीबदल करायची इच्छा असेल तर त्यांना अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर आरोग्यासंबंधीत काही तक्रारी जाणवू शकतील. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील, फिजिकल फिटनेसशी अंबंधीत लोक यांना ग्रहमान अनुकूल आहे. नवीन गुंतवणुक करणार असाल तर मात्र त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे नीट बघून व योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. सप्ताहाच्या शेवटी चांगले ग्रहमान आहे. धनलाभ होतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)