अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune, astrologerinkothrud)
मेष रास
सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्यासही हा कालावधी चांगला आहे. अचानक लाभही होऊ शकतील. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग येतील. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. मात्र ज्योतिषी, विमा व्यावसायिक, मानसोपचारतज्ञ व खासगी गुप्तहेर यांना हा कालावधी चांगले लाभ मिळवून देऊ शकेल. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. लांब अंतराचे प्रवासयोग शक्य. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करु शकाल. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. वैहाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कशात करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना मात्र काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मात्र जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
सिंह रास
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व कलाकारांना चांगला कालावधी आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी उत्तम कालावधी आहे. सप्ताह मध्यात व नंतर काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्य कलाकार, विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला जाईल. काही लाभही होतील. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो.
उपासना: मारुती उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. तुमच्यातील कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. खेळाडू व विद्यार्थ्यांनाही चांगले ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. चांगल्या घटना घडतील. काहींना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. भागीदारीतील व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समारंभाची. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी करावी लागेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादा धनलाभ होऊ शकेल. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्तरुप देऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात डोळे किंवा दात यांच्यासंबंधी काही त्रास जाणवू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभ होऊ शकतात. घरातील वातावरण छान असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचेही योग आहेत. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडिटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी काही अनावश्यक खर्च डोके वर काढतील. परदेशासंबंधीत कामांसाठी मात्र हा कालावधी चांगला आहे.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून आपल्याला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. काहींना प्रवास संभवतो. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)