अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात बुध, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. मात्र या काळत आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा. रागाने बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. सप्ताह मध्यात सोशल मिडियावर वादग्रस्त लेखन शेअर करु नका. भावंडांशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यानंतर प्रवासयोग शक्य. वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट यांना लाभदायक काळ आहे. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचे निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले असेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. विद्यार्थी वर्गाला हा काळा यशदायक ठरेल. प्रेमिकांना काही सुखद क्षण अनुभवता येतील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ शक्य आहे. कौटुंबीक सौख्याचा हा काळ आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. काहींना मानसन्मानाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव देणारं ग्रहमान आहे. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग शक्य.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. खर्चाचे प्रमाणही वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आह. गृहसौख्य लाभेल. काही लाभही होतील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, तृतीयस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. काहींना धनलाभ शक्य आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. सप्ताह मध्यात धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवासाचे योग शक्य. मात्र वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण या काळात वाढेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी शक्य. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या शेवटी काहींना कामाचा ताण जाणवेल. अती दगदग टाळावी. खर्च वाढतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. प्रवासाचे बेत आखाल. सप्ताह मध्यात तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल दिवस आहे. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित भेटी होतील. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी शक्य.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान प्रतिकूल आहे. महत्वाचे निर्णय शक्यतो घेऊ नका. जोखीम असलेली कामे या काळात कटाक्षाने टाळावीत. गूढ विषयांकडे मनाचा ऒढा असेल. मानसशास्रज्ञ, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठांची मर्जी राहील.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ आणि लाभस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. जोखीम असलेली कामे करु नका. गूढ विषयांमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. लाभदायक ग्रहमान आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत चांगली स्थिती राहील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. सप्ताह मध्यात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने सावकाश चालवावीत. जोखीम असलेली कामे करु नका. गूढ विषयांमध्ये मन रमेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात बुध, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान अनुकूल आहे. धनलाभ होईल. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताह मध्यात मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. वैहाहिक सौख्य मिळेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे आज कल असेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे प्रश्न काही निर्माण होतील. आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शुक्राशी त्रिकोणयोग होईल. २ तारखेला मंगळाचा नेपचूनशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीची कामे पार पडतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान अनुकूल आहे. धनलाभ होईल. मानसन्मानाचे योग आहेत. संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उपासनेत प्रगती होईल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)