अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, षष्ठस्थानात शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या लोकांशी संपर्क होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह मध्यात काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना चांगल्या संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवट संमिश्र घटनांचा असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मात्र डोके व डोळ्याच्या काही तक्रारी जाणवतील. ज्यांना मायग्रेन सारखे आजार आहेत त्यांनी काळजी घ्यावी.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. प्रवासयोग येतील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकांमुळे काही लाभदायक घटना घडू शकतील. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तु संशोधक यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर अचानक खर्चाची ठरु शकेल. बेकायदा व्यवहार टाळावेत. प्रॉपर्टी विक्रीसाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानात सूर्य, मंगळ, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वडीलधारी व्यक्तीशी वाद संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली मते दुसर्यांवर लादू नका. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात आपलं काम बरं आणि आपण बरे हे धोरण ठेवा. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. काही लाभ शक्य आहेत. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध, तृतीयस्थानात शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांनी होऊ शकेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावा. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. मात्र आपलीच मते बरोबर असा हट्ट सध्या करु नका. तब्येतीची काळजी घ्या. मधुमेहाचा त्रास असणार्यांनी या काळात जरा जास्तच जपायला हवे आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका. वरीष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.
उपासना: हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात विचित्र घटनांनी होऊ शकेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावा. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना शक्य आहेत. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणीव होईल. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना मात्र चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवट लाभदायक घटनांचा असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वकील/ फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रात काम करणार्यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी आपले व्यवहार पारदर्शक ठेवावेत. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मधूमेह किंवा पोटाचे आजार असणार्यांनी मात्र काळाजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वैहाहिक सौख्य मिळेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या छंदाला जरुर वेळ द्या. ग्रहमानाची साथ चांगली आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला आहे. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तब्येतीची मात्र काळजी घ्या.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ, एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने सुखावल्यासारखे होऊ शकेल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे. काहींना प्रवासाचे योग शक्य आहेत.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, भाग्यस्थानात शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी प्रतिकूल कालावधी आहे. बेकायदेशीर व्यवहारांमध्ये पडू नका. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. खरेदीसाठी चांगला काळ आहे काही अनावश्यक खर्चही या काळात करावा लागू शकेल. एखाद्या गोष्टीची काळजी वाटत राहू शकेल. सप्ताह मध्य कौटुंबिक सौख्याचा आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. पाककलेत मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व नेपचूनशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा शनीशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २६ तारखेला बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करेल व चंद्राचा गुरूशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छानशी खरेदी कराल. एखादा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. मात्र सध्या केलेला खर्च किंवा देऊ केलेला वेळ भविष्यात नक्की फ़ायदा देऊन जाईल हे नक्की. सप्ताहाच्या मध्यात काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी जबाबदारी येऊन पडेल. खर्च वाढतील. बेकायदा व्यवहार या काळात टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवावा. दातांसंबंधी किंवा डोळ्यांसंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्या.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)