अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, तृतीयस्थानात बुध, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना धनलाभ होतील. घरात एखादा छानसा कार्यक्रम आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात आजार अंगावर काढू नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात बुध, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काही मनाविरुध्द घटना घडणे शक्य आहे. विमा व्यावसायिक, ज्योतिषी, सर्जन यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवट धार्मिक गोष्टींसाठी चांगला आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात सूर्य, मंगळ, तृतीयस्थानात शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात तब्येतीच्या तक्रारी निर्माण होऊ शकतील. अॅसिडिटी किंवा पोटासंबंधी आजार असतील तर विशेष काळाजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक काळ आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे सहकार्य मिळेल. सप्ताहाचा शेवट काहिसा प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे या काळात करु नका.
उपासना: श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा या काळात जरुर जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टम स्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. उत्सव, समारंभ, चैन, मौजमजा यांनी हा काळ भरलेला असेल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. नोकरीत आपले काम बरे व आपण बरे हे धोरण ठेवावे. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात राहू, लाभस्थानात बुध, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना प्रवासाचे योग शक्य आहेत. लेखकांना व कलाकारांना चांगला काळ आहे. चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात घरात वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीच्या व्यवहारात कटकटी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रॉपर्टीचे व्यवहार तूर्तास टाळलेले बरे. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना चांगला कालावधी आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. खाण्यापिण्याची चंगळ असेल. मनासारखी खरेदी होईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवासयोगही शक्य आहेत. सप्ताह मध्य लाभ देणारा असेल. लेखक, वक्ते व कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर घरात वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रॉपर्टीची कामे सध्या टाळलेली बरी. सप्ताहाचा शेवट विद्यार्थांना व कलाकारांना चांगला आहे.
उपासना: या काळात गणपती स्तोत्र रोज म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, मंगळ आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. लाभ होतील. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर लागलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. संततीचे काही प्रश्न असतील तर ते सोडवाल. मनासारखी खरेदी होईल. तब्येत छान राहील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. आपल्या छंदांना जरूर वेळ द्यावा. एकंदरीतच संपूर्ण सप्ताह उत्तम व भाग्यवर्धक असणार आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ आणि दशमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनासारखी खरेदी होईल. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्य भाग्यवर्धक असेल. प्रवासयोग येवू शकतील. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू यांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या बोलण्यामुळे किंवा लिखाणामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सप्ताहाच्या अखेरीस प्रवास करणार असाल तर प्रवासात पुरेशी काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात राहू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. एखादा छानसा धनलाभ/ छानशी भेटवस्तू मन प्रसन्न करेल. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून फ़ायदा संभवतो. जोडीदाराला खुश करण्यासाठी काही खरेदी कराल. या काळात बेकायदा किंवा जोखीम असलेली कामे करु नका. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांकडून काही कामे होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मनाविरुध्द एखादी घटना घडू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जोडीदाराचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मनासारखे काम होणं या काळात थोडे कठीणच. मात्र रागावर निय़ंत्रण
ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभ शक्य आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मनाविरुध्द एखादा खर्च करावा लागू शकेल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळ, गुरु व शुक्राशी केंद्रयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी त्रिकोण आणि गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी युती व सूर्याशी प्रतियुती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगलाच जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर ज्योतिषी, मानसोपचातज्ञ यांना अनुकूल काळ आहे. चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी काहींना चांगले लाभ होतील.
उपासना: या काळात गणपती स्तोत्र रोज म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)