अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, तृतीयस्थानात सूर्य, बुध, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि लाभस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टी विकण्यासाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाचा मध्यात आपल्यातील कल्पनाशक्तीला वाव मिळेल. लेखक, साहित्यिक, प्रकाशक, विद्यार्थी व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी कायदेविषयक कामांसाठी अनुकूल काळ आहे. नोकरी करणार्यांना काही नवीन संधी मिळू शकतील. मात्र या काळात तुमच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, बुध, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. काहीतरी छान काम होईल. सप्ताह मध्यात लाभ देणारं ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिक यांना अनुकूल काळ आहे. एखादा नवीन विषय शिकायचा असेल किंवा आपल्या छंदाला वेळ द्यायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ संभवतो. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वेळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडीलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. साहित्यिक/ लेखकांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. संततीची प्रगती मनाला आनंद देणारी ठरेल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना हा कालावधी उत्तम आहे. एखादा धनलाभ प्रलंबित असेल तर त्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टम स्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात बुध, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. सप्ताह मध्यात आपल्या आवडीच्या पदार्थांवर मस्त ताव माराल. मात्र खाण्यापिण्यावर थोडा संयम या काळात बाळगायला हवा तसेच डोळ्यांची काळजी या काळात घ्यावी. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादा धनलाभ किंवा एखादं बक्षिस मिळण्याचे योग आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात बुध, राहू, लाभस्थानात सूर्य, आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. मनात विनाकारण कोणत्यातरी चिंता येत रहातील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात चांगलं काम होईल. त्यापासून काही लाभही होतील. त्यामुळे खुषीत असाल. घरातही प्रसन्न वातावरण असेल. मित्र किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताहाच्या मध्यात लागलेला शुभ ग्रहांचा सूर सप्ताहाच्या शेवटीसुध्दा कायम रहाणार आहे. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात बुध, राहू, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात काही खर्च अचानक सामोरे येतील. परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट छान जाणार आहे. धनलाभ होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना विशेषत: गायकांना हा काळ अतिशय चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात बुध, राहू, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात ग्रहांची अनुकूलता अजूनच वाढणार आहे. काहींचा मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात बुध, राहू, अष्टमस्थानात सूर्य आणि भाग्यस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही सतर्क रहावे असे ग्रहमान सांगत आहे. कामात केलेली कुचराई किंवा दिरंगाई नेमकी वरीष्ठांच्या नजरेत पडण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी या दरम्यान मोठी जोखीम असलेले व्यवहार शक्यतो करु नये. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मात्र एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्य़ाने त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात बुध, राहू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. मनाचा तोल जाऊ देऊ नये. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात बुध, राहू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. मस्त
पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. तब्येतीच्या काही मात्र कुरबुरी जाणवतील.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात बुध, राहू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी बुध, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १२ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व मंगळाशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शनिशी त्रिकोण होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वकील, फार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)