अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ मे ते १५ मे २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, हर्षल, धनस्थानात बुध, शुक्र, राहू, तृतीयस्थानात मंगळ, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खर्च वाढवणारा असेल. काही चिंताही असतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमवाल. सोमवार आणि मंगळवार रागावर नियंत्रण ठेवा. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग संभवतात. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक योग आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम हॊईल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, राहू, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, आणि व्ययस्थानात सूर्य, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. मित्रांशी किंवा आप्तेष्टांशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ संमिश्र असणार आहे. खर्च वाढतील. काही मनाविरुध्द घटना संभवतात. मात्र काहींना जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होऊ शकेल. सप्ताह मध्यात व नंतर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडू शकतात. कुटूंबासमवेत वेळ छान जाणार आहे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य, हर्षल आणि व्ययस्थानात बुध, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम झाल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. वरीष्ठ आपल्यावर खुष असणार आहेत. मित्र भॆटतील. काही मानसन्मान किंवा लाभही अपेक्षित आहेत. सप्ताह मध्यात मनासारख्या खरेदीचे योग आहेत. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही मनाविरुध्द घटना घडू शकतात. काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य, हर्षल, लाभस्थानात बुध, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला थोडासे प्रतिकूल ग्रहमान आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. वडीलधारी व्यक्तींशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही चांगल्या बातम्या कळतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांशी किंवा आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, हर्षल, दशमस्थानात बुध, शुक्र, राहू आणि लाभस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस थोडा प्रतिकूल आहे. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. धार्मिक गोष्टींसाठी किंवा उपासनेसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. कलेच्या क्षेत्रातील लोकांना विशेष चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, हर्षल, भाग्यस्थानात बुध, शुक्र, राहू आणि दशमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही प्रतिकूल प्रसंग घडतील. प्रवासात काळजी घ्या. शिक्षण क्षेत्रातील लोक तसेच सर्जन/ थेरपिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या छंदामध्ये वेळ छान जाईल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, हर्षल, अष्टमस्थानात बुध, शुक्र, राहू आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- रविवारी तब्येतीची काळजी घ्यावी. त्यानंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी काळेल. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी आपल्या भागीदाराला न सांगता किंवा विश्वासात न घेता केलेली गोष्ट नुकसानीची ठरु शकेल. सप्ताह मध्यात संमिश्र योग आहेत. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती प्रतिकूल आहे. या काळात जोखीम टाळलेली बरी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात  सूर्य, हर्षल, सप्तमस्थानात बुध, शुक्र, राहू आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. मन प्रसन्न असेल. त्यानंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी/ पोटाच्या काही तक्रारी असतील तर विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना मात्र हा काळ अतिशय लाभदायक असेल. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, हर्षल, षष्ठस्थानात बुध, शुक्र, राहू, सप्तमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काळ चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश असे समीकरण असेल. सप्ताह मध्यात नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. वकील, आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, हर्षल, पंचमस्थानात बुध, शुक्र, राहू, षष्ठस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- रविवार दुपारपर्यंतचा काळ अनुकूल आहे. भावंडांबाबत चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस प्रतिकूल ठरु शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात एखादी शाबासकी किंवा कौतुकाचे शब्द तुमची उमेद वाढवतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह अखेरीस नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, राहू, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी झालेला संपर्क आनंददायक ठरेल. लेखकांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात व नंतर घरात छान वातावरण असेल. लॉकडाऊनचा काळ असला तरी याही काळात नवनवीन कल्पना राबवून आनंद कसा निर्माण करायचा हे तुम्हा लोकांकडून शिकायला हवे. मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, हर्षल, तृतीयस्थानी बुध, शुक्र, राहू, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व हर्षलशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनीशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १४ तारखेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग आणि मंगळाचा शनिशी षडाष्टकयोग होईल.
फलादेश- रविवार दुपारपर्यंतचा काळ खरेदीसाठी चांगला आहे. नंतरचे दोन दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ होतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. त्यांच्याकडून काही लाभही होऊ शकतील. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. अती दगदग टाळावी. प्रॉपर्टीच्या कामांसाठी  प्रतिकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)