अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ मे ते ८ मे २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, हर्षल, धनस्थानात बुध, राहू, तृतीयस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांनी होऊ शकते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. एखादा सन्मान, बक्षिस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी पुर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ संभवतो.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, राहू, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार कंटाळवाणा व अडथळ्याचा जरी असला तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. नंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला जाणार आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. आवडत्या लोकांशी संपर्क होईल. सप्ताह अखेरीस धनलाभाचे योग आहेत. व्यवसाय करणार्यांना विशेष अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र घटनांचा असेल. त्या नंतरचे चार दिवस स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कोणतेही काम करु नये. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. विमा क्षेत्रात काम करणार्यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या वरीष्ठांच्या नाराजीला कारण ठरेल असे कृत्य़ आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिक्षण क्षेत्रातील लोकांना काही नवीन कल्पना राबविता येतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, लाभस्थानात बुध, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना व वकिलांना चांगली असेल. रविवारच्या दिवशी मात्र तब्येतीच्या कुरबुरी जाणवतील. सप्ताह मध्यात जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. सप्ताहाच्या मध्यानंतर कोणतेही आजार अंगावर काढू नका. जोखीम असलेली कामे सध्या करु नका. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे. वडीलधारी मंडळी किंवा आपले वरीष्ठ यांच्याशी वाद टाळावा. गूढ विषयांकडे मनाचा कल असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, दशमस्थानात बुध, राहू आणि लाभस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स/ कमोडीटी सारख्या व्यवहारापसून सध्या लांब रहावे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सप्ताह मध्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व वकीलांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांनी एखादी ऑफ़र मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कोणताही निर्णय तातडीने घेऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराला जपा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, भाग्यस्थानात बुध, राहू आणि दशमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात काही कुरबुरी/ कटकटी होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. सप्ताहाचा मध्य चांगला आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. वकील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसे आहारतज्ञ यांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात बुध, राहू आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील साफसफाई किंवा गृहसजावटीसाठी वेळ काढाल. मात्र अती दगदग टाळावी. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्यासाठी किंवा आपल्या छंदासाठी जरूर वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ संभवितात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, सप्तमस्थानात बुध, राहू आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटी किंवा संपर्क होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवावे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, षष्ठस्थानात बुध, राहू, सप्तमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल. लेखकांना व वक्त्यांना काळ चांगला आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस घरात वातावरण आनंदी असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, पंचमस्थानात बुध, राहू, षष्ठस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात काही कटकटींनी होऊ शकेल. काही अनावश्यक खर्च किंवा खरेदी होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाचा मध्य संमिश्र घटनांचा असेल. आत्मविश्वास वाढेल मात्र आपल्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींच्या बाबतीत धनलाभाचे योग हातातोंडाशी आलेले लांबतील. सप्ताहाच्या शेवटी कवी, लेखक यांच्यासाठी चांगला आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, राहू, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात संमिश्र काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहावे. सप्ताहाच्या शेवटी आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कामामुळे वरीष्ठांना खुश करु शकाल. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी बुध, राहू, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची प्लुटोशी युती होईल. ३ तारखेला शनिचा सूर्याशी केंद्रयोग व चंद्राशी युती होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी लाभयोग आणि शुक्राचा गुरुशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपुर्ण सप्ताह छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)