अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ जानेवारी ते ३० जानेवारी २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २५ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल, सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. छान मेजवानीचे बेत पार पडतील. मन प्रसन्न असेल. कार्यालयीन कामानिमित्त काहींना प्रवासयोग शक्य आहेत. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह मध्यात लेखक, वक्ते यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही चांगला काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर यांना ग्रहमान चांगले आहे. गृहसजावटीसाठी व घरासंबंधी काही गोष्टी प्रलंबित असतील तर त्यासाठी वेळ द्याल. सप्ताहाच्या अखेरीस कलाकार व विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
रविवारचा दिवस प्रतिकूल आहे. आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतील. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दी करणारे ठरु शकतील. मित्रांच्या भेटी आनंद देतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. प्रवासयोग येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींची भेट शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस आपल्या छंदांसाठी जरूर वेळ काढा. घरात छान वातावरण असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
रविवार खरेदीसाठी अनुकूल असेल. आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी छान खरेदी होईल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना फायदेशीर दिवस आहे. त्यानंतरचे दोन दिवस प्रतिकूल असणार आहेत. जोखीम असलेले कोणतेही काम यादरम्यान करू नका. वाहने जपून चालवा. ज्योतिषशास्त्रासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांना ग्रहमान चांगले आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मित्रांच्या किंवा प्रियजनांच्या भेटीचे तसेच प्रवासाचे योग येतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी अचानक काही खर्च करावे लागतील. या कालावधीत, आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. डोळे किंवा दातांसंबंधी काही समस्या जाणवतील.
उपासना: कालभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभ होतील. व्यापार्‍यांना एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. मित्रांच्या भेटी शक्य आहेत मात्र एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका. सप्ताह मध्यात चांगली खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. तब्येतीच्या काही कुरबुरी जाणवत राहतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामासाठी एखादा खर्च कराल. गृहसजावटीसाठी छानशी खरेदी करायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे किंवा वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ज्योतिष, मानसशास्त्र व ईन्शूरन्स हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग शक्य आहे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूलता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. काही लाभही होऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीतील व्यवसायाला पूरक ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना घडतील तर काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. धार्मिक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठांकडून कामे करुन घेण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. त्याचा फायदा करुन घ्या. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी काम करणार्‍यांसाठी फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी तसेच स्टेशनरी सप्लायर्स, छोटे विक्रेते यांना खूप अनुकूल असेल. जोडीदाराबरोबर हा काळ छान जाईल, सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असाल तर अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर प्रवास टाळावा.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल.  २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
रविवारी घरात छान वातावरण असेल. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. मित्रांच्या भेटी शक्य आहेत. धनलाभाचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवस विद्यार्थ्यांना, कष्टाला पर्याय नाही याची आठवण करुन देणारे असतील. आयात-निर्यात करणार्‍या व्यापार्‍यांना हा काळ नवीन संधी तेणारा ठरू शकेल. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. तब्येतीबाबत काही किरकोळ समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्य व शनि यांची युती होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व गुरुशी युती होईल तसेच चंद्राचा अनुक्रमे गुरु व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला  चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थी, खेळाडू, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. लग्न ठरविण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्यावी.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)