अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०१९)          

या सप्ताहात कंकणाकृति सूर्यग्रहण हॊणार आहे. त्याचा व्हायरस सर्वच राशिंवर कमी-अधिक प्रमाणात बघायला मिळणार आहे. सर्वांना विनंती की या सप्ताहात शक्यतो नविन व्यवहार तसेच प्रवास टाळावेत. रागावर नियंत्रण ठेवावे. नातेसंबंधात वितुष्ट येणार नाही याची दक्षता घ्यावी. बेकायदा गोष्टी टाळाव्यात. विशेषत: सोशल मिडीयावर काहिही शेअर करण्यापूर्वी त्याच्या परीणामांचा विचार आधी करावा आणि तब्येतीची काळजी घ्यावी.

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमस्थानात बुध, भाग्यात रवि, गुरु, शनि, केतू व प्लुटो, दशमात शुक्र, आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस वाहने जपून चालवावीत. कोणतेही जोखिम सध्या नको. जोडीदाराला अनिष्ट कालावधी आहे. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला असेल. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र गरज असेल तरच प्रवास करावा. प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात कुचराई करु नका. आपले वरीष्ठ नाराज होतील असे वर्तन टाळावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात बुध, अष्टमात रवि, गुरु, शनि, केतू व प्लुटो, भाग्यात शुक्र, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत आरोग्याच्या समस्या जाणवत रहातील. गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराशी वाद टाळावेत. पती/ पत्नीला वेळ द्या. आपापसात काही वाद असतील तर लवकरात लवकर कसे मिटतील ते बघा. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवावीत. सप्ताहाच्या शेवटी सासुरवाडीच्या नातेवाईकांचा विचित्र अनुभव येईल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. मात्र आपली धार्मिक मते इतरांवर लादू नका. काहींवर गुरुकृपा शक्य.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, पंचमात मंगळ, षष्ठात बुध, सप्तमात रवि, गुरु, शनि, केतू, प्लुटो, अष्टमात शुक्र, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना प्रतिकूल कालावधी आहे. यशासाठी झगडावे लागेल. मुलांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्या. प्रेमिकांसाठीही प्रतिकूल काळ आहे. एखादा धनलाभ होता होता राहिल्याने मन खट्टू होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस नविन नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र नोकरीबदल सध्या नको. अ‍ॅसिडिटी/ पोटाचा ज्यांना त्रास असेल त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी व्यवहार पारदर्शक ठेवावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात बुध, षष्ठात रवि, गुरु, शनि, केतू व प्लुटो, सप्तमात शुक्र, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहातील सुरुवातीला घरात प्रसन्न वातावरण असेल. छान खरेदीचे योग येऊ शकतात. आवडत्या माणसांचा सहवास लाभेल. मौज मजा करण्याकडे कल असेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकिय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात बुध, पंचमात रवि, गुरु, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात शुक्र, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांशी वाद टाळावेत. सोशल मिडियावर वादग्रस्त ठरेल असे काहिही शेअर करु नका. प्रवास शक्यतो या काळात नकोत. सप्ताहाच्या मध्यात घरगुती प्रश्न सोडवण्याकडे कल असेल. भरपूर काम करावे लागल्याने आराम मिळणार नाही. प्रॉपर्टीच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. खेळाडूंनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे मात्र तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात बुध, चतुर्थात रवि, गुरु, शनि, केतू, प्लुटो, पंचमात शुक्र, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. काहींना धनलाभ होऊ शकतील. घरातील वातावरण आनंदी असेल. सप्ताह मध्य प्रवासाचे योग आणू शकतो. मात्र वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम पाळा. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर आपल्या लिहिण्यामुळे वाद होणार नाहीत याची पुरेशी काळजी घ्या. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. काहींना नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळेल. आपल्या छंदांना जरुर वेळ द्या.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानी बुध, तृतिय स्थानात रवि, गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात शुक्र, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मन आनंदी असेल. मौजमजेचे प्रसंग घडतील. एखाद्या खाऊगल्लीला जरूर भेट द्या. आपल्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम झाल्याने खुश असाल. कलाकारांना, वक्त्यांना सप्ताह चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. मात्र त्यांच्याशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या छंदांना वेळ द्या. प्रवासासाठीही अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, धनस्थानी रवि, गुरु, शनि, केतू, प्लुटो, तृतिय स्थानात शुक्र, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक एखादा खर्च करावा लागेल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. परदेशगमनासाठी चांगला काळ आहे. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताहाच्या मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही आजार असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभाचे योग येतील. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, गुरु, शनि, केतू, प्लुटो, धनस्थानी शुक्र, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी मंगळ आणि व्ययस्थानी बुध अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काही लाभाचे प्रसंग शक्य आहेत. आवडत्या पदार्थांच्या मेजवानीचा योग येईल. सप्ताह मध्यात खरेदीचे योग आहेत. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना छान धनलाभाचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, दशमात मंगळ, लाभस्थानी बुध, आणि व्ययस्थानी रवि, गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. मात्र कागदपत्रे तज्ञांकडून जरुर तपासून घ्यावेत नंतरच व्यवहार करावेत. सप्ताह मध्यात जुन्या मित्रांची किंवा आप्तेष्ठांची भेट सुखावून टाकेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमस्थानी बुध, लाभस्थानी रवि, गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. ऑफ़िसच्या कामासाठी प्रवासयोग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग येतील. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना जास्त अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी बुध दशमस्थानी रवि, गुरु, शनि, केतू, प्लुटो, लाभस्थानी शुक्र, आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्र मंगळ युती व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध धनु राशित व मंगळ वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वृश्चिक राशित बुधाची चंद्राशी युती होईल. २६ तारखेला चंद्र गुरु युती होईल. २७ तारखेला रवि गुरु युती होईल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताहाचा शेवटी मित्रांच्या भेटीचे योग येतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध
#भविष्य