अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ जानेवारी ते २ फेब्रुवारी)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, शुक्र, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात रवी, बुध, केतू, लाभात नेपचून व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. काहींना जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. नित्यउपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, शुक्र, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात रवी, बुध, केतू, दशमात नेपचून, लाभात मंगळ आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांना व वकीलांना हा काळ चांगला आहे. नोकरीबदल किंवा नवीन नोकरीसाठी अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराला फ़ायदेशीर ग्रहमान आहे. भागीदारीत व्यवसाय असेल तर चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेर मनाविरोधी घटनांची ठरु शकेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, शुक्र, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात रवी, बुध, केतू, भाग्यात नेपचून, दशमात मंगळ आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांना अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, शुक्र, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात रवी, बुध, केतू, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकुल काळ. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व प्रेमिकांसाठी अनुकुल आहे, प्रवासयोग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील, फ़िजिकल फ़िटनेससंबंधी काम करणारे यांना अनुकूल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, शुक्र, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात रवी, बुध, केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात मंगळ, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहे. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी, प्रकाशक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात घरात वाद होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. विद्यार्थ्यांना अनुकुल काळ आहे. कलाकार, खेळाडूंचीही विशेष प्रगती होऊ शकते.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, शुक्र, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात रवी, बुध, केतू, षष्ठात नेपचून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. प्रवासात काळजी घ्या. आपल्या जोडीदाराशी वाद टाळा. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. उद्योग व्यवसायामध्ये सुरुवातीला लागलेला चांगला सूर सप्ताहाच्या शेवटीही जाणवत राहील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शुक्र, तृतियस्थानात शनी, प्लुटो, चतुर्थात रवी, बुध, केतू, पंचमात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला ईतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्यांना अनुकूलता असेल. गूढ गोष्टींकडे मन ओढले जाऊ शकते. प्रवास करणार असाल तर आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवि यांना अनुकुल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियस्थानात रवी, बुध, केतू, चतुर्थात नेपचून, पंचमस्थानात मंगळ आणि षष्ठस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल.
२९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. आपल्या आवडीच्या व्यक्तींसाठी खास भेटवस्तू घ्यायला हरकत नाही. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी. ऊपासना करणार्यांना विशेष अनुकूलता आहे. सप्ताह मध्यात उगीचच कुठल्यातरी गोष्टींची चिंता वाटत राहील. ऊन्हाचा त्रास जाणवू शकतो. डोकेदुखी/ मायग्रेनचा त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी रवी, बुध, केतू, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना धनलाभ संभवतात. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात काही खर्च करावे लागतील. पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतात. ज्यांच्या नोकरी/ व्यवसायाचा संबंध परदेशाशी आहे अशांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट मनाविरुध्द घटनांचा ठरु शकेल. आपल्या चीजवस्तु सांभाळा. परदेश प्रवास करण्यासाठी मात्र अनुकुल कालावधी आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, केतू, धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी राहू, आणि लाभस्थानी गुरु, शुक्र व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरिष्ठांकडून बक्षिस/ शाबासकी मिळू शकेल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या भेटी होतील. छान गेट-टुगेदर करायला हरकत नाही. प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना विशेषत: नर्तनकलेशी संबंधितांना अनुकुल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, शुक्र, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी रवी, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, शुक्र, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभस्थानी रवी, बुध, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला रविची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. आणि १ तारखेला मंगळ व प्लुटोचा केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला ईतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्यांना विशेष अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकुल काळ आहे. काहींना सुचक स्वप्ने पडू शकतात. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. धनलाभही होतील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध