Weekly horoscope ( 14 October – 20 October 2018).
(Astrologer-Pune-Astroshodh- Atul H. Kulkarni-9422088979)
अॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, षष्ठस्थानात रवि, सप्तमात शुक्र, बुध, अष्टमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सुरुवातीलाच एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक
कार्यक्रमात भाग घ्याल. गूढ विषयाकडे ऒढा राहिल. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास
वाढविणार्या घटना घडतील. कार्यक्षेत्रातील सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे
चीज होईल. मनासारखे काम होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल.
सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या गाठीभेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात. महालक्ष्मीची उपासना फ़ायदेशीर ठरेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, पंचमात रवि , षष्ठात शुक्र, बुध,
सप्तमात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व कटकटीची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल
तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. जोडिदाराला जपा. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. कुलस्वामिनीचा जप करावा. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. नवनवीन कल्पना सुचतील. काहींना प्रवासाचे योग संभवतात. प्रवासात आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. मात्र आपल्या वरिष्ठांची नाराजी ऒढवेल असे वर्तन टाळावे. कामात हलगर्जीपणा नको.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, चतुर्थात रवि, पंचमात बुध,
शुक्र, षष्ठात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. मात्र जोडीदाराच्या तब्बेतीला जपा. भागीदारीतल्या व्यवहारात सावध रहाण्याची गरज आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. मात्र सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. १७ तारखेचे रवि राश्यांतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी
खुप चांगले आहे. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. जोडिदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय चालू करण्यास अनुकुल काळ आहे. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. मारुतीची उपासना करावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, तृतियेत रवि, चतुर्थात बुध, गुरु, शुक्र, पंचमात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे, न्युट्रीशिअन्स, फ़िजिकल फ़िटनेसमध्ये काम करणारे तसेच वकील यांना हा कालावधी खुप चांगला आहे. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींशी विशेषत: जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी विनाकारण कोणाशी शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहने हळू चालवावीत. जोखिम असलेले काम सध्या तरी टाळलेलेच बरे. तब्येतीची काळजी घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, तृतियेत बुध, गुरु, शुक्र, चतुर्थात गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. एखादं बक्षिस, शाबासकी,
सन्मान मिळू शकेल. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह मध्यात तब्बेतीकडे लक्ष द्यावे. फ़िजिकल फ़िटनेस/ वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा कालावधी अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. मारुतीची उपासना करावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, शुक्र, तृतियेत गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. लेखक/ कवी यांना हा काळ खुप चांगला आहे. एखादा कोर्स किंवा कामाशी संबंधीत काही शिक्षण घ्यायचं असेल तर ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकुल कालावधी आहे. सप्ताह अखेर तब्बेतीला जपावे. विशेषत: दमा/ वाताचे काही त्रास असतील तर काळजी घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र धनस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा
सहवास लाभेल. भावंडांच्या भेटीगाठीचे योग संभवतात. प्रवासात खिसा पाकीट सांभाळावे.
ब्लॉगर्स, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू, लाभस्थानी रवि, आणि व्ययस्थानी बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील.
घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनासारखी खरेदी होईल. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा
नातेवाईकांच्या गाठीभेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला
आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कांमांना वेळ द्यावा लागेल.
प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, दशमस्थानी रवि,
लाभस्थानी बुध, शुक्र आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. खरेदीसाठी अनुकुल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. गायक व कलाकार यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह अखेर उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकुल काळ आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. भावंडांची खुशाली कळेल. जवळचे प्रवास शक्य. वरीष्ठांची अनुकुलता राहील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी राहू, भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी बुध, शुक्र आणि
लाभस्थानी गुरु, व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकुल काळ.
सप्ताह मध्यात केलेल्या कामाचं चीज झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. कलाकार, वादक,
कवी यांच्यासाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी मनावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या चीजवस्तु/ पैशांचं पाकीट/ कागदपत्रे सांभाळा. डॊळ्यांची विशेष काळजी घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू, अष्टमस्थानी रवि, भाग्यस्थानी बुध, शुक्र, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी,
व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे
केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आप्तेष्ठांच्या किंवा
मित्रमंडळींच्या भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल.
काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमनाचे योग संभवतात.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,
सप्तमस्थानी रवि, अष्टम स्थानी बुध, शुक्र, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल, १७ तारखेला रवि राश्यांतर करुन तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग आणि नेपचूनशी त्रिकोणयोग होईल.
छान आठवडा आहे. भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. सप्ताह मनाजोगता जाणार
आहे. काहींना छान प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. त्यामुळे खुशीत
असाल. सप्ताहाच्या मध्यात अती रागाने कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी
घ्यावी. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभ संभवतो. मस्त पार्टीचा मूड असेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya