– वृश्चिक राशीतील गुरुभ्रमण –
तुळेतील गुरु दि. ११/१०/२०१८ रोजी संध्याकाळी ७.३५ वाजता राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तेथे तो २९/०३/२०१९ पर्यंत असेल आणि पुन्हा २२/०४/२०१९ ते ५/११/२०१९ पर्यंत असेल. वृश्चिक रास ही गुरुची मित्ररास असल्याने गुरुची शुभ फ़ळे अधिक जोरकसपणे जाणवतील. प्रत्येक राशीला वृश्चिक राशीतील गुरुभ्रमण हे कसे असेल ते आपण बघुया. (Atul H. Kulkarni- 9422088979)
मेष रास-
मेष राशीला आठवा गुरु येत आहे.
१) हा संमिश्र फ़ळे देणार आहे. मेष राशीसाठी व्ययेश गुरु आठव्या स्थानात येणार आहे. हा विपरीत योग असुन काही बाबतीत अत्यंत शुभ फ़ळे देईल.
२) सुखस्थानावरील ९ वी दृष्टी सुखात वाढ करेल. ज्यांना घर घ्यायचं असेल अशांना तसेच घराचं दुरुस्ती/ नूतनीकरण ज्यांना करायचं असेल त्यांना अत्यंत शुभ काळ आहे.
३) व्ययस्थानावर ५ वी दृष्टी असेल. पारमार्थिक उन्नतीसाठी ज्यांना प्रयत्न करायचा असेल त्यांच्यासाठी हा गुरु काही अनुभुती देऊ शकतो. खर्च मात्र या काळात वाढणार आहेत.
४) काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. पती/ पत्नीचा उत्कर्ष होण्याची शक्यता आहे.
५) गुरुची सप्तम दृष्टी कुटंबस्थानावर/ धनस्थानावर असणार आहे. घरातील वातावरण छान असेल. आर्थिक स्थितीही चांगली असेल. (अॅस्ट्रोशोध)
६) भावंडांशी मात्र वाद टाळावे.
७) वडीलधारी मंडळी किंवा गुरुतुल्य व्यक्तींची नाराजी जाणवेल.
८) तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करुन चालणार नाही.
९) दत्त उपासना किंवा महालक्ष्मी मातेची उपासना जरुर करावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृषभ रास-
गेल्या वर्षभर एकाच वेळी शनी व गुरुची नाराजी सोसल्यामुळे तुम्ही हवालदिल झालेले होतात. आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला गुरु सातवा येत आहे.
१) हा अत्यंत शुभ योग आहे.
२) लाभस्थानावर त्याची ५ वी दृष्टी असेल. त्यामुळे आता वर्षभर अनेक लाभ अपेक्षित आहेत. अडकलेले पैसेही आता मिळु शकतील. काहींना बढती/ पगारवाढ मिळेल. Astroshodh
३) पराक्रम स्थानावर त्याची ९ वी दृष्टी असेल. भावंडांशी संबंध जिव्हाळ्याचे रहातील. लेखक/ ब्लॉगर्स/ कवी यांना हे वर्ष खुप चांगले जाईल.
४) लग्नस्थानावरील ७ वी दृष्टी तुमचा प्रभाव वाढवेल. मन प्रसन्न ठेवेल. अधिकारात आता वाढ होईल.
५) विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी आता अनुकुल काळ आहे. वृषभ राशीला अष्टमेश असलेला गुरु सप्तमात येत आहे त्यामुळे जोडीदाराची काळजी घ्या.
६) भागीदारीत व्यवसाय असेल तर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
७) शारीरीक सौख्यासाठी जीम/ योगासने/ ईतर व्यायामासाठी हा काळ उत्तम आहे.
८) मित्रांकडून लाभ होतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मिथुन रास-
मिथुन राशीला सहावा गुरु येत आहे.
१) हा संमिश्र फ़ळे देणार आहे. नोकरीसाठी / नोकरी बदलीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगला काळ आहे.
२) दशम स्थानावर त्याची ५ वी दृष्टी असेल. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. आपले वरीष्ठांशी चांगले संबंध असतील. व्यावसायिकांनाही आता वर्षभर गुरु अनुकुल आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा कालावधी अनुकुल आहे.
३) गुरुची ९ वी दृष्टी कुटंबस्थानावर/ धनस्थानावर असणार आहे. घरातील वातावरण छान असेल. आर्थिक स्थितीही चांगली असेल. (अॅस्ट्रोशोध)
४) गुरुची ७ वी दृष्टी व्ययस्थानावर असेल. त्यामुळे आता खर्च वाढणार आहेत. तुम्ही साठवलेले पैसे काही कामांसाठी तुम्ही बाहेर काढणार आहात. साठविलेल्या पैशांना वाटा फ़ुटणार आहेत. खर्च करतांना काळजी घ्यावी.
५) मधूमेहाची ज्यांच्या घरात परंपरा आहे अशांनी वर्षभर काळजी घ्यावी. नियमित व्यायाम करावा व आहारावर नियंत्रण ठेवावे.
६) हितशत्रूंकडे लक्ष टःएवावे लागेल.
७) जोडीदार व वडील यांच्या तब्यतीकडे लक्ष ठेवावे. त्यांच्याशी वाद टाळा.
८) अध्यात्मिक उन्नतीसाठी हा गुरु चांगला आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कर्क रास-
कर्क राशीला पाचवा गुरु येत आहे.
१) हा अत्यंत शुभ योग आहे.
२) भाग्यस्थानावर त्याची ५ वी दृष्टी असेल. त्यामुळे वर्ष भाग्यवर्धक घटनांचे असेल.
३) लग्नस्थानावरील ९ वी दृष्टी तुमचा प्रभाव वाढवेल. मन प्रसन्न ठेवेल. अधिकारात आता वाढ होईल.
४) लाभस्थानावर त्याची ७ वी दृष्टी असेल. त्यामुळे आता वर्षभर अनेक लाभ अपेक्षित आहेत. काहींना बढती/ पगारवाढ मिळेल. मित्रांकडून लाभ होतील. (अॅस्ट्रोशोध)
५) चतुर्थाच्या धनस्थानातून गुरुचे होणारे भ्रमण ज्यांना नवीन घर घ्यायचं असेल त्यांना शुभ काळ आहे. प्रॉपर्टीसंबंधीत सर्वच कामांसाठी हा गुरु अनुकुल आहे. Astroshodh
६) विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना हे वर्ष चांगले आहे. संततीबाबत शुभ समाचार मिळतील.
७) आवडत्या गोष्टी/ छंद याला आता वेळ देता येणार आहे.
८) काहींना अचानक लाभ होतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
सिंह रास-
सिंह राशीला चौथा गुरु येणार आहे. आपल्या राशीला तो तितकासा चांगला नाही.
१) सुखस्थानातील गुरु प्रॉपर्टीबाबत कटकटी निर्माण करु शकेल. झोपेसंबंधी ज्यांना काही आजार असतील तर त्यांनी वेळीच उपचार करण्याची गरज आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
२) अष्टमस्थानावर ५ वी दृष्टी असेल. हा गुरु ज्योतिष, रेकी इ. सारख्या गूढ विषयांची गोडी निर्माण करेल. विमा क्षेत्राशी संबंधीत लोकांना हे भ्रमण चांगले आहे.
३) गुरुची आता व्ययस्थानावर ९ वी दृष्टी असेल. पारमार्थिक उन्नतीसाठी ज्यांना प्रयत्न करायचा असेल त्यांच्यासाठी हा गुरु काही अनुभुती देऊ शकतो. खर्च मात्र या काळात वाढणार आहेत. परदेशगमानासाठी हा योग चांगला आहे. Astroshodh
४) दशम स्थानावरची ७ वी दृष्टी आपल्याला नविन कार्यक्षेत्रात संधी निर्माण करुन देईल. व्यावसायिकांना आता वर्षभर गुरु अनुकुल आहे.
५) रागावर नियंत्रण ठेवा. माणसं तुटतील असं वागू नका.
६) महालक्ष्मीची उपासना जरुर करावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कन्या रास-
तुम्हाला तिसरा गुरु येत आहे.
१) हा गुरु संमिश्र फ़ळे देणार आहे.
२) सप्तम स्थानावर त्याची ५ वी दृष्टी असेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी आता अनुकुल काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगल्या घटना घडतील. भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगले यश मिळेल.
३) वादग्रस्त ठरतील अशा पोस्ट सोशल मिडियावर टाकणे टाळावे.
४) लाभस्थानावर त्याची ९ वी दृष्टी असेल. त्यामुळे आता वर्षभर अनेक लाभ अपेक्षित आहेत. काहींना बढती तसेच पगारवाढीचे चांगले योग येतील.. Astroshodh
५) भाग्यस्थानावर त्याची ७ वी दृष्टी असेल. धार्मिक गोष्टींसाठी हा गुरु अतिशय चांगला आहे. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात.
६) या वर्षभरात प्रॉपर्टीची कामे टाळलेलीच बरी.
७) भावंडांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
तुळ रास-
१) हा गुरु संमिश्र फ़ळे देणार आहे.
२) कौटुंबिक सुख व पैशांच्या बाबतीत हा गुरु अनुकुल आहे.
३) षष्टस्थानावरची ५ वी दृष्टी तसेच षष्टेश धनस्थानात आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना हा गुरु अनुकुल आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी वर्षभरात रहाणार आहेत. विशेषत: मधूमेहाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी डोळ्यांची काळजी घ्यावी.
४) दशमस्थानावरची ९ वी दृष्टी आपल्याला आपल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकुल आहे. व्यावसायिकांना आता वर्षभर गुरु अनुकुल आहे.
५) गुरुची अष्टम स्थानावरची ७ वी दृष्टी चीजवस्तु/ पैसे गहाळ होणे असे योग दाखविते. चुकीचं बोलण्यामुळे कोणाशी शत्रुत्व येण्याची शक्यता आहे. त्याबाबत काळजी घ्या. (अॅस्ट्रोशोध)
६) मानसशास्त्राशी संबंधीत लोक, ज्योतिषी, सर्जन यांना हा कालावधी चांगला आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
वृश्चिक रास-
१) आधीच साडेसाती आणि त्यात व्ययातील गुरु यामुळे गेल्या वर्षभरात तुमच्या जिवनात बरीच उलथापालथ झाली असणार. आता तुमच्याच राशीत येणारा गुरु तुम्हाला मोठा दिलासा देणार आहे. Astroshodh
२) पंचमस्थानावरची गुरुची ५ वी दृष्टी तुमचं लक मोठ्या प्रमाणात दाखवीत आहे. प्रमोशन/ पगारवाढ/ बक्षिस याचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना हे वर्ष चांगले आहे. संततीबाबत शुभ समाचार मिळतील.
३) गुरुची ९ वी दृष्टी भाग्यस्थानावर आहे. भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी हा गुरु अनुकुल आहे.
४) गुरुची ७ वी दृष्टी सप्तम स्थानावर आहे. लग्न ठरविण्यासाठी हा गुरु अनुकुल आहे. विवाहित असणार्यांच्या बाबतीत पती/ पत्नीचा भाग्योदय होईल. सुखाचा काळ आहे.
५) मान सन्मान मिळतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
धनु रास-
१) व्ययात येणारा गुरु आपल्याला वर्षभर प्रतिकूल असणार आहे. आपला खर्च वाढण्याची शक्यता आहे.
२) सुखस्थानावरील ५ वी दृष्टी प्रतिकुलता कमी करणार आहे.
३) अष्टमस्थानावर ९ वी दृष्टी असेल. हा गुरु ज्योतिष, रेकी इ. सारख्या गूढ विषयांची गोडी निर्माण करेल. विमा क्षेत्राशी संबंधीत लोकांना हे भ्रमण चांगले आहे. Astroshodh
४) षष्टस्थानावरची ७ वी दृष्टी आपल्याला तब्येतीबाबत सतर्क रहाण्यास सांगत आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना हा गुरु अनुकुल आहे. हितशत्रुंवर नजर ठेवा. (अॅस्ट्रोशोध)
५) दत्त उपासना किंवा महालक्ष्मी मातेची उपासना जरुर करावी.
मकर रास-
१) लाभात येणारा गुरु आपल्याला अनुकुल असणार आहे.
२) पराक्रम स्थानावर त्याची ५ वी दृष्टी असेल. भावंडांशी संबंध जिव्हाळ्याचे रहातील. लेखक/ ब्लॉगर्स/ कवी/ कलाकार यांना हे वर्ष खुप चांगले जाईल.
३) सप्तम स्थानावर त्याची ९ वी दृष्टी असेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी आता अनुकुल काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगल्या घटना घडतील. भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगले यश मिळेल.
४) पंचमस्थानावरची गुरुची ५ वी दृष्टी तुमचं लक मोठ्या प्रमाणात दाखवीत आहे. प्रमोशन/ पगारवाढ/ बक्षिस याचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना हे वर्ष चांगले आहे. संततीबाबत शुभ समाचार मिळतील.
५) व्ययेश गुरु लाभात आहे. परदेशगमनासाठी हा गुरु अनुकुल आहे. (अॅस्ट्रोशोध)
६) या वर्षभरात चांगले धनलाभ होतील. केलेल्या कामाचं कौतुक होईल. मित्र/ मैत्रिणींचं सहकार्य चांगलं मिळेल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
कुंभ रास-
१) गुरु आता आपल्या दशमात येणार आहे. हा गुरु संमिश्र फ़ळे देणार आहे.
२) गुरुची ७ वी दृष्टी कुटंबस्थानावर/ धनस्थानावर असणार आहे. घरातील वातावरण छान असेल. आर्थिक स्थितीही चांगली असेल.
३) गुरुची ९ वी षष्टस्थानावरची दृष्टी नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकुल आहे. मात्र तब्येतीची काळजी वर्षभर घेत रहावं लागेल. व्यायाम करत नसाल तर आता सुरु करावा. Astroshodh
४) चतुर्थ स्थानावर गुरुची ७ वी दृष्टी ज्यांना नवीन घर घ्यायचं असेल त्यांच्यासाठी अनुकुलता देईल. प्रॉपर्टीसंबंधीत सर्वच कामांसाठी हा गुरु अनुकुल आहे.
५) आपल्या कार्यक्षेत्रात हलगर्जीपणा करु नका. वरीष्ठांचा रोष ऒढवेल असं आपल्या हातून वर्तन घडणार नाही याची काळजी घ्या.
६) मित्र/ मैत्रिणींमुळे किंवा ऒळखीमुळे महत्वाची कामे मार्गी लागतील.
७) दत्त उपासना जरुर करावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
मीन रास-
१) गेल्या वर्षभर गुरुची नाराजी आपल्यावर होती. गुरु आता आपल्या भाग्यस्थानात येणार आहे. आता वर्षभर तो अत्यंत अनुकुल असेल.
२) लग्नस्थानावरील ५ वी दृष्टी तुमचा प्रभाव वाढवेल. मन प्रसन्न ठेवेल. अधिकारात आता वाढ होईल.
३) पंचमस्थानावरची गुरुची ९ वी दृष्टी तुमचं लक मोठ्या प्रमाणात दाखवीत आहे. प्रमोशन/ पगारवाढ/ बक्षिस याचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना हे वर्ष चांगले आहे. संततीबाबत शुभ समाचार मिळतील. Astroshodh
४) पराक्रम स्थानावर त्याची ७ वी दृष्टी असेल. भावंडांशी संबंध जिव्हाळ्याचे रहातील. लेखक/ कलाकार/ वक्ते यांना हे वर्ष खुप चांगले जाईल.
५) धार्मिक गोष्टींसाठी हा गुरु चांगला आहे.
६) लांबचे प्रवासयोग येतील.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )
गुरु बदल हा राशी कडून पाहायचा का लग्ना कडून
धन्यवाद
चंद्रराशीवरुन बघा.