
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, गुरु, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, दशमस्थानात राहू, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सोमवारी दुपारपर्यंत घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मौज-मजा करण्याकडे कल असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या मुलांशी या दरम्यान वाद होणार नाहेत याची दक्षता घ्या. ज्योतिषशास्त्रासारख्या गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी मात्र हा काळ उत्तम आहे. सप्ताह मध्यानंतर वकील, नेते, फ़ार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल काळ आहे. तब्येतीची मात्र थोडी काळजी या काळात घ्यावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, षष्ठस्थानी बुध, शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात राहू, प्लूटो आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सोमवारी दुपारपर्यंत प्रवासासाठी अनुकूल आहे. भावंडांशी संवाद साधाल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. कामात सुयश लाभेल. त्यानंतरचे दोन दिवस दिवस आनंदात जाणार आहे. घरात छान वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे करण्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना ग्रहमान चांगले आहे. प्रेमिकांना हा काळ लग्न ठरविण्यास अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांनाही काळ चांगला आहे. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू तृतीयस्थानी मंगळ, गुरु, पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानी सूर्य, अष्टमस्थानात राहू, प्लूटो, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात योग्य ती सर्व काळजी घ्यावी. अॅसिडिटी, पोटाचे काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी या दरम्यान पाळायलाच हवे. सप्ताह मध्यानंतर घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग शक्य. सप्ताह अखेर संततीसौख्य लाभेल. मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिकांना काळ अनुकूल आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानी मंगळ, गुरु, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात सूर्य, सप्तमस्थानात राहू, प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून आणि लाभस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. कलाकारांना त्यांच्या कलेसाठी प्रशंसा ऐकायला मिळू शकेल. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर फायदेशीर ग्रहमान आहे.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्याचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, गुरु, तृतीयस्थानी बुध, शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, षष्ठस्थानी राहू, प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कार्यात सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. खरेदीसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींच्या कामांना ग्रहांची अनुकूलता आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. कलाकार, लेखक व साहीत्यिक यांना ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, पंचमस्थानात राहू, प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सोमवार दुपारपर्यंत उत्तम ग्रहमान आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. दैनंदिन कामे रेंगाळतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. बेकायदा गोष्टी या दरम्यान टाळा. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. आर्थिक लाभ होतील. एखाद्या खाऊगल्लीला आपल्या जिवलगांबरोबर फेरफटका मारुन यायला हरकत नाही. कलाकारांना विशेषत: गायकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेर मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, शुक्र, धनस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात राहू, प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, दशमस्थानात केतू आणि लाभस्थानात मंगळ, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. धनलाभ होतील. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशी नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. मन प्रसन्न असेल.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, तृतीयस्थानी राहू, प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, गुरु आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करीत असाल तर वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी शक्य आहेत. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. चैन करण्याकडे कल असेल. कलाकारांना व परदेशाशी ज्यांचा कामाचा संबंध असतो त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात राहू, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, अष्टमस्थानात केतू, नवमस्थानात मंगळ, गुरु, लाभस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सोमवार दुपारपर्यंत संमिश्र काळ आहे. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. संशोधक, विमा व्यावसायिक, सर्जन, ज्योतिषी यांना ग्रहमान अनुकूल आहे. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक गोष्टींसाठी चांगले आहेत. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, प्लूटो, धनस्थानात तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात मंगळ, गुरु, दशमस्थानात बुध, शुक्र आणि लाभस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सोमवारी दुपारपर्यंत जोडीदाराबरोबर वेळ छान जाऊ शकेल. मन आनंदी व उत्साही राहील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे टाळा. मित्र-मैत्रिणींबरोबर छोट्याशा कारणाने गैरसमज होणार नाही म्हणून काळजी घ्या. मात्र काही लोकांना हाच काळ अचानक धनलाभाचा ठरणार आहे. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट उत्तम असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खूष असतील. एखादी चांगली संधी किंवा लाभदायक घटना यादरम्यान अचानकपणे चकित करु शकेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानी मंगळ, गुरु, नवमस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात राहू, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. जोखीम असलेली कामे मात्र या दरम्यान करु नका. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य आहे. लांबच्या प्रवासाचे बेत मनात घोळत राहतील.
उपासना: ’ॐ र्हां र्हीं र्हौं स: सूर्याय नम:’ या मंत्राची रोज एक माळ जपावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात मंगळ, गुरु, अष्टमस्थानात बुध, शुक्र, नवमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात राहू, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग हॊईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि नंतर बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सोमवार दुपारपर्यंत लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. त्यानंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासात योग्य ती काळाजी आवश्यक आहे. वकील, फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांना चांगला कालावधी आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. एखाद्या गोष्टीतील अचानक करावा लागलेला बदल किंवा परीवर्तन भविष्यकाळात फायदेशीर ठरु शकेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)