
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. रविवार भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रवासयोगही शक्य. त्यानंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. सप्ताहाच्या मध्यात एखादा सन्मान, बक्षिस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. काहींना लाभ संभवतात. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकेल. उपासनेत मन रमेल. छान खरेदी होईल. मनोरंजनाकडे कल राहील. परदेशातील कामांसाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानी सूर्य, बुध, शुक्र(व), भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार संमिश्र असेल. काही लाभ होतील. मात्र जोखीम असलेली कामे रविवारी टाळा. नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारनंतरच्या दोन दिवसात लाभदायक घटना घडतील. धार्मिक कार्यक्रम/ उपासना करण्यास हा काळ विशेष चांगला असणार आहे. काही भाग्यवर्धक घटनाही घडू शकतील. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाचा मध्य व नंतरचा कालावधीसुध्दा चांगलाच असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने तुमचे मन प्रसन्न असेल. घरातील वडीलधारी मंडळींचा व कार्यक्षेत्रातील वरीष्ठांचा पाठींबा व मदत या काळात तुम्हाला मिळणार आहे. सप्ताह अखेरीस आवडती माणसे भेटतील. धनलाभाचेही योग आहेत. व्यवसायिकांना संपूर्ण सप्ताह विशेष अनुकूल आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मात्र व्यवसायातील आर्थिक निर्णय शक्यतो संध्याकाळपूर्वीच घ्या. त्यानंतरचे दोन दिवस स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कोणतेही काम यादरम्यान करु नका. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. धार्मिक गोष्टींसाठी मात्र अनुकूल काळ आहे. विमा क्षेत्रात काम करणार्यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या शेवटी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून आणि लाभस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना व वकिलांना चांगली असेल. रविवारी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. भाग्यवृध्दीकारक गोष्टी शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र तब्येतीच्या कुरबुरी जाणवू शकतील. नंतरचे चार दिवस संमिश्र आहेत. तुमच्या स्वत:च्या व जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. कोणतेही आजार अंगावर काढू नका. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, डेटा अॅनालिस्ट, संशोधक, ज्योतिषी यांना चांगला ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र(व), षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स/ कमोडीटी सारख्या बेभरवशाच्या व्यवहारांपसून सध्या लांब रहावे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. विशेषत: वातामुळे ज्यांना त्रास किंवा आजारपण आहे त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह मध्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व वकीलांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांनी एखादी ऑफ़र मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कोणताही निर्णय तातडीने घेऊ नका. सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकला. या काळात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. ज्योतिषशास्त्र, रेकी, अध्यात्म, कुंडलिनी जागरणे यांचा अभ्यास तसेच कोणत्याही विषयातील संशोधन कार्यासाठी हा कालावधी विशेष चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध, शुक्र(व), पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ, गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य तसा चांगला आहे. काहींना धनलाभाचे योग येतील मात्र त्यासाठी थोडी जास्त वाट पहावी लागेल. विद्यार्थ्यांनाही जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. प्रेमिकांनाही मात्र लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. वकील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसे आहारतज्ञ यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
उपासना: स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ, गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडांशी संवाद साधाल. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. दमा किंवा श्वासासंबंधी काही त्रास असतील तर योग्य ती काळजी घेणे या दरम्यान आवश्यक आहे. अती दगदग टाळावी. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्यासाठी किंवा आपल्या छंदासाठी जरूर वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. मधूमेह असणार्यांनी पथ्यपाणी व्यवस्थित पाळावे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी किंवा संपर्क मनाला आनंद देतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठीही चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटनाही शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी राहील.
उपासना: या काळात रोज मारुती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, गुरु, नवमस्थानात केतू आणि लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताह मस्त जाणार आहे. सोमवार ते गुरुवार उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. घरात छान वातावरण असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(श), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, अष्टमस्थानात केतू आणि दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नृत्यकलेशी ज्यांचा संबंध आहे त्यांना विशेष चांगला कालावधी आहे. परदेशगमन किंवा त्यासंबंधीत काही कामे असतील तर त्याला आता गती देऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्याच्या जोरावर काही लाभ मिळतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कवी, लेखक, ब्लॉगर्स यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवासयोग शक्य. विवाहोत्सुकांसाठीही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, गुरु, सप्तमस्थानी केतू, नवमस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल काळ आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एकंदरीतच लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र काळ आहे. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. कलाकारांना विशेष चांगला काळ आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहावे तसेच नकारात्मक विचार मनात येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, पंचमस्थानात मंगळ, गुरु, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र(व), लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राची शनिशी व सूर्याची शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. मानसन्मानाचे योग आहेत. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. नंतरचे दोन दिवस उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा/ नतेवाईकांचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल तसेच काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतील. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मान मिळेल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)