
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, सप्तमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला चांगली साथ देणार आहे. डेटा अॅनालिस्ट, संशोधक, कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संपर्क साधाल. साहित्यिकांसाठी व कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. छान प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. मन प्रसन्न असेल. प्रॉपटीची कामे मार्गी लागतील. घराची डागडुजी किंवा घरातील वस्तूंची दुरुस्ती प्रलंबित असेल तर त्यासाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. शनिवारी तब्येतीची काळाजी घ्यावी.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानी शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला आर्थिक स्थिती चांगली असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. नवनवीन कल्पना सुचतील. आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. प्रवासाचे योग संभवतात. लेखक, प्रकाशक, वक्ते यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मुलांच्या प्रगतीबाबत समाधनी असाल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस कलाकारांना व विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यात चांगली प्रगती दिसेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी गुरु, तृतीयस्थानी सूर्य, बुध, केतू, पंचमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. त्यानंतर दोन दिवस तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात धनलाभाचे काही योग संभवतात. कुटुंबीयांबरोबर वेळ छान व्यतीत कराल छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. या काळात तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम या दरम्यान मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मनोबल वाढविणारी घटना घडेल, प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानी सूर्य, बुध, केतू, चतुर्थस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान खरेदीने होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. धार्मिक कार्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण काळ छान आहे. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक असा हा काळ असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहे. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर व आनंददायक ठरतील.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, केतू, तृतीयस्थानी शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घराच्या देखभालीसाठी किंवा सजावटीकडे लक्ष द्याल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा किंवा काही अनपेक्षित खर्चाचा आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे काही छंद असतील तर त्यासाठी किंवा नविन विषयांचा अभ्यास करण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताहाच्या अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखाद्या खाऊगल्लीला आपल्या जिवलगांबरोबर फेरफटका मारुन यायला हरकत नाही. मन प्रसन्न असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकेल. कार्यालयीन कामासाठी प्रवासदेखील करावा लागू शकेल. व्यावसायिकांचे प्रलंबीत असलेले निर्णय मार्गी लागतील. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टी टाळाव्या. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. सप्ताह अखेरीस मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात गुरु आणि लाभस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात
अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा वरीष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. मनसन्मान/ किर्ती वाढेल. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईच्या भेटीची शक्यता आहे. वेळ मजेत जाईल. सप्ताह अखेरीस खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता असेल. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपासनेत मन रमवा.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. या दरम्यान अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही आजार असतील तर अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. मात्र हा कालावधी विमा क्षेत्रात काम करणारे तसेच ज्योतिषी यांना अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मनासारखे काम झाल्याने खुश असाल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात गुरु नवमस्थानात सूर्य, बुध, केतू, आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना ग्रहमान अनुकूल आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मात्र हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, डेटा अॅनालिस्ट, संशोधक, ज्योतिषी यांना चांगला ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. आर्थिक लाभ शक्य. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट उत्तम आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि दशमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग या दरम्यान टाळा. आपले आरोग्य सांभाळा. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. एखाद्या महत्वाच्या पदासाठी अचानक तुमची वर्णी लागू शकेल. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानी सूर्य, बुध, केतू, नवमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम असणार आहे. मुलांकडून सुवार्ता कळतील. एखादं बक्षिस, भेटवस्तू किंवा वरीष्ठांकडून मिळालेली कौतुकाची थाप मनाला आनंद देऊन जाईल. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारा हा कालावधी आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. मात्र यादरम्यान तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेली कामे टाळा.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानात सूर्य, बुध, केतू, अष्टमस्थानात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग, मंगळाशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि तिथे तो चंद्राशी लाभयोग करेल. ८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी व्हाल. घरातील कामांसाठीही वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. इस्टेट एजंट तसेच बिल्डर्स यांच्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. सप्ताहाचा मध्य लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. काही लाभही होतील. संततीचे यश तुमच्या आनंदाचे कारण ठरु शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर प्रतिकूल ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. हितशत्रूंवरही लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)