अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान असेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना व वकीलांना काळ अनुकूल आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांनाही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर प्रतिकूल घटना शक्य आहेत. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने जपून चालवा. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग याच काळात संभवतात. गूढ विषय या काळात तुम्हाला आकर्षित करतील. ज्योतिष, अध्यात्म, पुराण, रेकी अशा विषयांची गोडी असेल तर अभ्यास सुरु करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. शनिवार प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काही लाभही शक्य.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. सप्ताह मध्यात सामाजिक कामात सहभागी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. फ़िजिकल फ़िटनेस/ वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काळ चांगला आहे मात्र या काळात हितशत्रूंवर लक्ष ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचे योग आहेत. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, बुध, गुरु, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभ होण्याचे योग आहेत. घरात आनंदी वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखाद्या छानशा समारंभ किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येऊ शकतील. सप्ताहाचा मध्यसुद्धा अनुकूल आहे. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना विशेष यशाचा कालावधी असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. मात्र तब्येतीची काळजी या दरम्यान घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याचे योग आहेत.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, धनस्थानी केतू, तृतीयस्थानी शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. लेखक, ब्लॉगर्स, साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खुष असाल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे सुशोभीकरण किंवा दुरुस्तीसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र दिवस आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. शेअर मार्केटसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात सध्या मोठी गुंतवणूक अजिबात करु नका. परदेशासंबंधी कामांसाठी मात्र हा काळ चांगला ठरणार आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानी शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रतिकूल कालावधी आहे. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत याचीही दक्षता या काळात घ्ययला हवी. महत्वाची आर्थिक कामे सोमवारी रात्रीपर्यंत टाळा. सप्ताह मध्यात आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोग शक्य आहेत. व्यावसायिक कामासंबंधीत केलेले प्रवासयोग विशेष लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटीचे य़ोग येतील किंवा त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी राहील. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या शेवटीसुद्धा उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कला, कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. यादरम्यान प्रवासयोग शक्य तसेच सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि लाभस्थानात केतू, व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र काही अचानक खर्चही यादरम्यान उद्भवू शकतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर करायला मदत होईल. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. घरात आनंदी वातावरण असेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना मस्त धनलाभाचे योग आहेत. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. आपल्या जिवलगांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील. ज्यांना परदेशात जायचे आहे किंवा त्यासाठी बर्‍याच काळापासून प्रयत्न करत असाल तर काही सकारात्मक गोष्टी समोर येतील. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता असेल. वाहने सावकाश चालवा.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि नवमस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. आज वरीष्ठांची नाराजी होईल असे वर्तन टाळावे. तुमच्या कामामध्ये विनाकारण अडथळे निर्माण होऊ शकतील. मन विचलित होऊ देऊ नका. गुंतवणूक करत असाल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरुर घ्या. ज्योतिष शस्त्र, मानसशास्त्र, रेकी अशा विषयांच्या अभ्यासासाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. प्रवासाचेही योग संभवतात. सप्ताहाचा शेवट संमिश्र असेल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मात्र बेकायदा गोष्टी या दरम्यान टाळाव्या. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि अष्टमस्थानात केतू, नवमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. धार्मिक कार्यात सहभाग असेल. जोडीदाराबरोबर दिवस आनंदात जाणार आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. प्रलंबीत असलेले निर्णय मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. सप्ताहाचा शेवट अचानक झालेल्या धनलाभाने चकीत करेल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. मात्र या काळात अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे आजार असणार्‍यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, बुध, गुरु, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. एखादा नवीन विषय शिकायचा असेल तर जरुर सुरुवात करा. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन भविष्यात फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. नित्योपासनेत लक्ष लागणार नाही. मात्र संशोधन कार्य, Artificial Inteligence, Cloud computing, Insurance या क्षेत्रांशी संबंधीत कामे करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रसिध्दी मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानी शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. विवाहोत्सूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेली कामे करु नका. याउलट सर्जन, भूलतज्ञ, मानसशास्रासंबंधी काम करणारे किंवा इतर वैद्यकीय व्यवसाय कराणार्‍या लोकांना ग्रहमान फायदेशीर आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाच्या शेवटी दिवस आनंदात जाणार आहे. घरात छान वातावरण असेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)