
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानकपणे करावे लागतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. मात्र उपासनेत मन रमेल. पारमार्थिक उन्नती करणार्यांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, डेटा अॅनालिस्ट, संशोधक, ज्योतिषी यांना खूप चांगला ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक सुयश मिळेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. योग्य ते प्रयत्न वरीष्ठांच्या सल्याने केल्यास काही महत्वाकांक्षा या काळात पूर्णत्वास जाऊ शकतील. सप्ताह मध्यात जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. उधारी वसूल होईल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना एखादी चांगली बातमी कळेल. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. खर्चही या काळात वाढणार आहेत. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल. सप्ताहाच्या शेवटी मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. संततीबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानी सूर्य, गुरु, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ एखादी शाबासकीची थाप मिळू शकते. सप्ताह मध्य लाभदायक आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. सप्ताह अखेरीस जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. जुनी येणी वसूल होतील. छान खरेदीचे योग आहेत. मनोरंजनाकडे कल राहील. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, धनस्थानी केतू, तृतीयस्थानी शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी जोखीम असलेली कामे टाळा. त्यानंतर दोन दिवस भाग्यवृध्दीकारक आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. परदेशाशी संबंधीत असलेल्या कामांमध्ये प्रगती होईल. मात्र या काळात पायाला काही दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आहेत. सप्ताह अखेरीस नातेवाईक/ आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानी शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. मात्र हाच काळ विमा सल्लागार, मानसोपचारतज्ञ, डेटा अॅनालिस्ट तसेच ज्योतिषी यांना फयदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यात धार्मिक कार्यात सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासयोगही या काळात शक्य. मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न प्रलंबित असतील तर त्यासाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. घरात छान वातावरण असेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, गुरु आणि व्ययस्थानात केतू, अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. भविष्यकाळात घडणार्या घटनांचे संकेत आधीच मिळण्याचे संकेत आहेत. मात्र या दरम्यान जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. या काळात महत्वाचे व्यवहार करायचे असतील तर कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत असे ग्रहस्थिती सांगत आहे. सप्ताहाच्या शेवटी मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. उपासनेत मन लागेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. काही लाभही होतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, गुरु आणि लाभस्थानात केतू, व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना व वकिलांना काळ चांगला आहे. मात्र या दरम्यान आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद जाणवेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताह अखेरीस जोखीम असलेली कामे आज करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकला. मात्र ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध विमा, मानसशास्त्र, इतिहास, ज्योतिष, रेकी अशा विषयांशी संबंधीत आहे त्यांना लाभदायक ग्रहस्थिती असेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, गुरु आणि दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. खेळाडू व कलाकारांना हा कालावधी विशेष यशदायक आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, गुरु आणि नवमस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोगही शक्य. त्यानंतर मंगळावार रात्रीपर्यंतचा काळ संमिश्र आहे. रागावर नियंत्रण ठेवा. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. विद्यार्थी, खेळाडू व नृत्यकलेशी संबंधितांना ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. वैद्यकीय व्यवसाय कराणारे व वकील यांनाही हा काळ चांगला आहे. मात्र या काळात तुमचे आरोग्य सांभाळा.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानात सूर्य, गुरु आणि अष्टमस्थानात केतू, नवमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. तुमच्या चांगल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या करीयरमध्ये वृध्दी करण्यासाठी काही नवीन विषय शिकायचे असतील/ कोर्सेस करायचे असतील/ छंद जोपासायचे असतील तर त्यासाठी जरुर वेळ काढा. सप्ताहाच्या शेवटी भाग्यकारक ग्रहमान आहे. काही लाभ मनाला आनंद देतील. कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला चांगले ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत एखाद्या खाऊगल्लीला जरुर भेट द्या. सप्ताह मध्य चांगला असेल. मनोबल उत्तम राहील. कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कामात सुयश लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घराच्या नुतनीकरणासाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी कराल.
उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, गुरु, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानी शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. उपासनेत मन लागेल. सप्ताहाच्या शेवटी कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग शक्य. कागदपत्रांसंबंधी कामे करतांना मात्र या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)