अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ जुलै ते १ ऑगस्ट २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, पंचमस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. आर्थिक लाभ होतील. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्‍यासही हा कालावधी चांगला आहे. प्रवासयोग शक्य. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून या काळात फायदा होईल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. परदेशाशी संबंधीत कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे मात्र खर्च या काळात वाढणार आहेत. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर वेळ छान जाईल. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना हा संपूर्ण सप्ताहच विशेष अनुभुतीचा ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’जय शंकर’ या मंत्राचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, चतुर्थस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. या काळात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योगही काहींना याच काळात अनुभवायला मिळू शकतील. ज्योतिषी, इतिहासकार, संशोधक यांना मात्र हाच काळ विशेष यश देणारा आहे. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना घडतील. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस बर्‍याच काळापासून अपूर्ण राहिलेली एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत ’हनुमान चालिसा’ किंवा ’मारुती स्तोत्र’ रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानी सूर्य, गुरु, तृतीयस्थानी शुक्र, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यापार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र धोका असलेली कामे या दरम्यान टाळा. एखाद्या गोष्टीतील अचानक करावा लागलेला बदल किंवा परीवर्तन भविष्यकाळात फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह अखेरीस भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. या पूर्ण सप्ताहात वाहन जपून चालवा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, धनस्थानी शुक्र, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. वकील, आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना हा काळ विशेष चांगला आहे. तब्येतीच्या तक्रारी मात्र जाणवत रहातील. मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. व्यापार्‍यांनी मोठे धोके या काळात घेऊ नयेत. सप्ताह मध्यानंतर दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. रागावर नियंत्रण ठेवावे. कुंडलिनी जागृती, ध्यानधारणा, रेकी, षटचक्रांचा अभ्यास अशा गोष्टींसाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम असणार आहे. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. वाहने जपून चालवा. संशोधक, दत्त उपासक तसेच अध्यात्मिक उपासना करणार्‍यांना चांगले अनुभव येतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, गुरु आणि व्ययस्थानात शुक्र केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. संमिश्र दिवस आहे. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, गुरु आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. बढती किंवा बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात काही सकारात्मक घटना घडण्याची शक्यता आहे. कलाकौशल्याला वाव मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. सप्ताह मध्यानंतर संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. खेळाडू व विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. या पूर्ण सप्ताहात तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, गुरु आणि दशमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कौटुंबीक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यातही नशीबाची साथ मिळेल. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी कराल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह अखेर संततीचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज दत्तबावनी म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, गुरु आणि नवमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कामे मात्र शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्त रुप देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेर आरोग्याची काळजी घ्या. कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानात सूर्य, गुरु आणि अष्टमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना फायदेशीर काळ आहे. जुनी येणी वसूल होतील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान चांगले आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोगही शक्य. सप्ताह अखेरीस तुमच्या संभाषणकौशल्यामुळे कामे होतील. गायकांना त्यांच्या कलेचा आनंद मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत ’हनुमान चालिसा’ किंवा ’मारुती स्तोत्र’ रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, सप्तमस्थानी शुक्र, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभही शक्य आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडिटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. पूर्वीच्या गुंतवणुकी चांगला फायदा देऊ शकतील. परदेशासंबंधीत कामांसाठी हा कालावधी चांगला असणार आहे. मात्र याच काळात काही अनावश्यक खर्चही डोके वर काढतील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ किंवा ’श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा रोज जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, गुरु, षष्ठस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. प्रलंबीत असलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकेल. वरिष्ठांकडून अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. महत्वाचे आर्थिक व्यवहार करतांना पुरेशी काळजी घेणंही आवश्यक आहे. या दरम्यान कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. खर्च वाढतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)