अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ जून ते ४ जुलै २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, गुरु, शुक्र, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी रात्रीपर्यंचा काळ संमिश्र आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वाहने जपून चालवावीत. नंतरच्या दोन दिवसात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. खरेदीसाठीही काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल व सहकार्‍यांची मदत मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल व छान मोबदलाही मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात. छान खरेदी कराल. ज्यांना परदेशगमन करायचे आहे अशांसाठी संपूर्ण सप्ताह चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध, गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. नंतरचे दोन दिवस गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग या काळात शक्य आहेत. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन इ. गोष्टींशी आहे त्यांना ग्रहमान उत्तम आहे. या दरम्यान भविष्य काळातील घटनांबाबत काही संकेत तुम्हाला मिळू शकतील. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले कार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. काही लाभ होतील. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी बुध, गुरु, शुक्र, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी आरोग्याच्या काही तक्रारी असू शकतात. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी पाळा. आहारावर नियंत्रण ठेवा. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर आनंदात जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. एखाद्या गोष्टीतील अचानक करावा लागलेला बदल किंवा परीवर्तन आत्ता त्रासदायक वाटत असेल तरी ते भविष्यात फायदेशीर ठरु शकेल. सप्ताहाच्या अखेरीस धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासयोग शक्य.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, शुक्र, धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात मंगळ, हर्षल, आणि व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. शिक्षण क्षेत्रातील लोक, न्यायाधीश तसेच वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना हा काळ अनुकूल आहे. प्रलंबीत कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. मात्र यादरम्यान तब्येतीची काळजी घ्या. विशेषत: मधूमेह असणार्‍यांनी पथ्यपाणी सांभाळण्यात हयगय करु नका. सप्ताह मध्यात व नंतर जोडीदाराची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. मात्र हा काळ पुराण, अध्यात्म, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासास चांगला आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात मंगळ, हर्षल, लाभस्थानात सूर्य, आणि व्ययस्थानात बुध, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घरात छान वातावरण असेल. बांधकाम व्यावसायिक तसेच इस्टेट एजंट यांना चांगल्या संधी चालून येतील. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. परदेशासंबंधी असलेल्या कामांमध्ये यश मिळेल. संततीसाठी काही खरेदी कराल. नवीन काही शिकायचं असेल तर त्यासाठी ग्रहस्थिती चांगली आहे. मात्र या काळात शेयर किंवा अन्य जोखीम असलेले व्यवहार शक्यतो टाळा. जर असे व्यवहार करावेच लागणार असतील तर ते करतांना तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. प्रेमी जीवांनी या दरम्यान एकमेकांशी वाद होणार नाहीत यांची दक्षता घ्या. सप्ताह मध्यात व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत कायदा/ न्यायव्यवस्थेशी संबंधीत असणार्‍यांना चांगला फायदा देणारा काळ ठरु शकेल. मात्र या काळात तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीला जपा.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा/ आप्तेष्टांचा सहवास लाभेल. काही लाभ शक्य. त्यानंतरचे दोन दिवस कौटुंबीक सौख्याचे आहेत. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीच्या/ मित्रमैत्रिणींच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्य लाभदायक आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस प्रतिकूल ग्रहमान आहे. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. कलाकार, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात कामात सुयश लाभेल. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर संमिश्र ग्रहमान आहे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. स्पर्धा-परीक्षेसाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. नंतरचे दोन दिवस लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात व नंतर लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीसुध्दा हा कालावधी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान जोखीम असलेली कामे करु नका. आणि वाहने सावकाश चालवा. मधूमेह असेल तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. सप्ताह मध्यात व नंतर भाग्यवर्धक ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. साहित्यिक, लेखक व कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. काही लाभही या काळात शक्य आहेत. भावंडांची खुशाली कळेल. प्रवासासाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, सप्तमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. जुनी येणी वसूल होतील. मात्र या दरम्यान अती दगदग टाळा. तब्येतीची काळजी घ्या. सप्ताह मध्यात व नंतर अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. प्रवास फायदेशीर ठरतील.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी बुध, गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. काहींना परदेशगमनाचे योग संभवतात. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल.
सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नशीबाची साथ मिळेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, गुरु, शुक्र, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासयोग आहेत. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मनासारखी खरेदी होऊ शकेल. मात्र खर्चही वाढतील. आयात-निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांना चांगला फायदा या काळात मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)