अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ जून ते २७ जून २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर वेळ छान जाईल. कुटुंबीयांसोबत जवळपासची एखादी सहल किंवा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला जरुर भेट द्या. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदारांसाठी चांगले आहेत. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असाल तर काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योगही काहींना शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. काहींना अनपेक्षित लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग शक्य. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी मात्र जाणवत रहातील तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानी गुरु, शुक्र, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्यासाठी वेळ काढावा लागेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवाल. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना यशदायक काळ आहे. संततीच्या प्रगतीमुळे सुखावून जाल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी, पोटाचे, उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी. तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. बेकायदा गोष्टी टाळा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात मंगळ, हर्षल, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र आहे. बोलण्यावर संयम ठेवावा. तब्येतीची काळजी घ्या. प्रिय व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य. नंतरचे दोन दिवस प्रवासाचे योग येऊ शकतात. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी. पैशांची कामे लांबू शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात मंगळ, हर्षल, लाभस्थानात सूर्य, बुध, आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारच्या दिवशी तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढलेला असेल. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. नंतरचे दोन दिवस घरातील लोकांबरोबर छान जातील. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात तुमच्या लेखनामुळे किंवा बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. प्रवास करणार असाल तर प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या मध्यानंतर कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. सोमवार, मंगळवार चांगले आहेत. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. भाग्यवृध्दीकारक योग आहे्त. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोग शक्य.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. धनलाभ होण्याचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवसांत पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र या काळात टाळावी. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक स्थिती असेल. प्रलंबीत असलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. सप्ताह अखेरीस ग्रहमान संमिश्र आहे. आर्थिक सुयश लाभेल. मात्र मात्र तुमच्या बोलण्यामुळे या दरम्यान लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. प्रवास शक्यतो टाळावेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. मात्र एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यात सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सोमवार, मंगळवार तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक जीवनात चांगल्या घटना शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताह अखेर खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. खरेदीसाठी मात्र चांगला सूर लागू शकेल. पारमार्थिक उन्नतीसाठीही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु, शुक्र आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र असू शकेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे करु नका. अती दगदग या कालावधीत टाळा. सोमवार, मंगळवार भाग्यकारक घटनांचे ठरु शकतील. नोकरदार मंडळींनी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. फ़ार्मासिस्ट व शिक्षणक्षेत्रातील लोकांना काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानी गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस विमा क्षेत्रातील लोकांना काळ अनुकूल आहे. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. काहींना अचानक धनलाभाचे योग या काळात शक्य आहेत. मात्र धोका असलेले कुठलेही काम या दरम्यान करु नका. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. कलाकारांना हा कालावधी उत्तम आहे. प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. धनलाभ शक्य आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात गुरु, शुक्र, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल, चंद्राचा शुक्राशी लाभयोग आणि शनिशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवार संमिश्र आहे. तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर छान जातील. वैवाहिक सौख्य मिळेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)