
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ जून ते १३ जून २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, हर्षल, तृतीयस्थानी बुध, शुक्र, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सोमवार संध्याकाळपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. धनलाभाचे योग आहेत. मात्र खर्चही वाढणार आहेत. एखाद्या मित्राचा/ जवळच्या व्यक्तीचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खरेदीसाठी चांगले आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक क्षेत्रात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. गायकांना तसेच वक्त्यांना उत्तम ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, हर्षल, धनस्थानी बुध, शुक्र, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीमुळे काही कामे मार्गी लागू शकतील. धनलाभाचेही योग आहेत. बर्याच दिवसांची एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. परदेश प्रवासासाठी ग्रहमान अनुकूल आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र या दरम्यान अचानक काही खर्च उद्भवू शकतात. बेकायदा गोष्टी टाळाव्या. सप्ताहाच्या अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, धनस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वडीलधारी व्यक्तीशी वाद टाळावेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली मते दुसर्यांवर लादू नका. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. राजकारणाशी संबंधीत लोकांना मात्र ग्रहमान चांगले आहे. अचानक अनुकूल घडतील. सप्ताह मध्यात रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. धनलाभ होण्याचे ही योग आहेत. सप्ताह अखेरीस वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, हर्षल आणि व्ययस्थानात बुध, शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषशास्त्र, पुराण, कुंडलिनी जागृती, अध्यात्म अशा गूढ विषयांच्या अभ्यासासाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे. जोखीम असलेली कामे मात्र टाळा. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास शक्य. यादरम्यान मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह अखेरीस कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. शनिवारी खरेदीसाठी काळ चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, हर्षल, लाभस्थानात बुध, शुक्र, आणि व्ययस्थानात गुरु, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना शक्य आहेत. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. मात्र एखाद्या गोष्टीतील अचानक करावा लागलेला बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणीव होईल. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. उपासनेत मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य. धनलाभ होण्याचे योग आहेत. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, हर्षल, दशमस्थानात बुध, शुक्र, लाभस्थानात गुरु, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यातही सहभाग राहील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वकील/ फिजिकल फिटनेस या क्षेत्रात काम करणार्यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात लाभदायक काळ आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर प्रतिकूल घटनांचा काळ असू शकतो. या काळात वाहने हळू चालवावीत. कोणतीही जोखीम या काळात महागात पडू शकते. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. काही लाभ शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: दत्त उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, हर्षल, भाग्यस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात गुरु, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू, बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कर्मचार्यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग छान करुन घ्याल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, हर्षल, अष्टमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात गुरु, आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. बिल्डर्स, इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या छंदाला जरुर वेळ द्या. ग्रहमानाची चांगली साथ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. संततिसौख्य लाभेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सप्ताह मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास या काळात शक्य. या काळात हितशत्रूंवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभही या काळात शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, हर्षल, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात गुरु, आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासाचे योगही संभवतात. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. ध्यानधारणा/ कुंडलिनी जागृती/ रेकी अशा विषयांच्या अभ्यासासाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर एखादा धनलाभ/ एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने प्रसन्न असाल. तुमच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक स्थिती असेल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान प्रतिकूल आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. तब्येतीची काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, हर्षल, षष्ठस्थानी बुध, शुक्र, सप्तमस्थानात गुरु, आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मानसन्मान मिळेल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. लोकांच्या कौतुकाला पात्र व्हाल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, हर्षल, पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. आत्मविश्वास वाढेल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल कालावधी आहे. मनोरंजनाकडे कल राहील. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मात्र एखाद्या गोष्टीची काळजी सतत वाटत राहू शकेल. सप्ताह मध्य कौटुंबिक सौख्याचा आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. पाककलेत मन रमेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र या दरम्यान तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि गुरु-शुक्र युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. उपासनेत मन रमेल. सप्ताहाच्या मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. काही लाभही शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)