
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३१ मे ते ६ जून २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, हर्षल, तृतीयस्थानी बुध, गुरु, शुक्र, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सोमवार संध्यकाळपर्यंत काळ संमिश्र आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना कालावधी अनुकूल आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. या काळात जोखीम असलेली कोणतीही कामे करु नका. नंतरच्या दोन दिवसात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. परदेशाशी संबंधीत कामांसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, हर्षल, धनस्थानी बुध, गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सोमवार संध्यकाळपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. आयात-निर्यात करणार्या व्यापार्यांना मात्र अनुकूल दिवस आहे. नंतरचे दोन दिवस गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग शक्य. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन, Data Analysis, Artificial Inteligence इ. गोष्टींशी आहे त्यांना उत्तम ग्रहमान आहे. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, शुक्र, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय व्यावसायिकांना हा काळ जास्त चांगला आहे. मात्र या दरम्यान घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. तुमच्या तब्येतीला जपा. सप्ताह मध्य चांगला आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनासुध्दा काळ चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर गूढ विषयांमध्ये मन रमेल. एखादा नवीन विषय शिकायचा असेल तर या काळात जरुर सुरुवात करा. एखाद्या गोष्टीतील अचानक करावा लागलेला बदल किंवा परीवर्तन भविष्यकाळात फायदेशीर ठरु शकेल. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान टाळा. सप्ताहाच्या अखेरीस भाग्याची साथ मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, हर्षल आणि व्ययस्थानात बुध, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान उत्तम आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल. खेळाडूंना नेत्रदिपक यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. मधूमेह असणार्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. मात्र या काळात प्रलंबीत कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर वाद टाळा. नित्योपासनेत या काळात लक्ष लागणार नाही असे दिसते आहे मात्र हा काळ पुराण, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, हर्षल आणि लाभस्थानात बुध, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभही होतील. उपासनेत मन लागेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. शनिवारी जोडीदाराला जपा.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, हर्षल, दशमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कामात सुयश लाभेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासयोगही शक्य आहेत. हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, डेटा अॅनालिस्ट, संशोधक, ज्योतिषी यांना खुप चांगला ठरु शकेल. सप्ताह मध्यात कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताहाच्या अखेरीस संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. मात्र अती दगदग या काळात टाळा.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, हर्षल, भाग्यस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र या दरम्यान तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. सप्ताह मध्यात कलाकार, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह अखेर संमिश्र आहे. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, हर्षल, अष्टमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. मात्र तुमच्या बोलण्यामुळे य दरम्यान लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. सप्ताह मध्यानंतर लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, हर्षल, सप्तमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्य चांगला असेल. आर्थिक सुयश लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यानंतर कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. गायक व कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल ठरु शकेल. भावंडांची खुशाली कळेल. वरीष्ठांची अनुकूलता राहील. प्रॉपर्टीची कामे पार पडतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, हर्षल, षष्ठस्थानी बुध, गुरु, शुक्र आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. जुनी येणी वसूल होतील. मन समाधानी असेल. सप्ताह मध्यात व नंतरही अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, हर्षल, पंचमस्थानात बुध, गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. नोकरी/ व्यवसायातील लोक भरपूर कामात व्यस्त असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. घरात छान वातावरण असेल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभ शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, गुरु, शुक्र, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. २ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग तर चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहात सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ कामावर खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. उपासनेत मन लागेल. प्रवासयोग आहेत. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मनासारखी खरेदी होऊ शकेल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)