
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ मे ते ३० मे २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, बुध, हर्षल, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबाबत चांगली बातमी कळेल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदारांसाठी चांगले आहेत. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्यांच्या बाबतीत काही अनुकूल घटना शक्य आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग काहींना शक्य. मात्र वाहने जपून चालविणे या काळात आवश्यक आहे.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, हर्षल, धनस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. काही लाभदायक घटनाही शक्य. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. व्यापार्यांना अनुकूल काळ आहे मात्र अती दगदग त्रासदायक ठरु शकेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्यासाठी वेळ काढावा लागेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवाल. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांनाही ग्रहमान चांगले आहे. संततीच्या प्रगतीमुळे सुखावून जाल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अॅसिडिटी, पोटाचे किंवा उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. मात्र नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. मामा किंवा मवशीची भेट शक्य आहे.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, हर्षल आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमानाची साथ तुम्हाला लाभणार आहे. धनलाभाचे योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम होईल. त्यामुळे वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी त्यांच्याकडून मान्य करुन घेण्यासाठी ही वेळ योग्य ठरु शकेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील. त्यांच्याबरोबर वेळ मजेत जाणार आहे. घरात एखादं गेट-टुगेदर किंवा पार्टी आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. मनोरंजनाकडे कल राहिल. मात्र ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. धडाडी वढेल. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार व खेळाडू यांना अनुकूल स्थिती आहे. शेअर मार्केटसारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना मात्र योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, हर्षल आणि लाभस्थानात गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. नंतरचे दोन दिवस घरातील किंवा आवडत्या लोकांबरोबर छान जातील. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. आर्थिक सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. परत काही लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील. वेळ मजेत जाईल. साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार यांच्यासाठी तर हा काळ उत्तमच आहे. काहीतरी नविन स्फ़ुरेल किंवा गवसेल. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, हर्षल, दशमस्थानात गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. नंतरचे दोन दिवस उत्तम आहेत. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभही होतील. उपासनेत मन लागेल. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग येतील. आर्थिक सुयश लाभेल. कार्यक्षेत्रात छान काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. तुमच्या संभाषणकौशल्याचा जोरावर एखादं काम मार्गी लागेल. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन भविष्यात फायदेशीर ठरु शकेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, भाग्यस्थानात गुरु, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. खर्च वाढतील. या काळात बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य भाग्यवृध्दीकारक आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, अष्टमस्थानात गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नंतरच्या दोन दिवसात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा अतीरेक या काळात होणार नाही याची या काळात दक्षता घेणे आवश्यक आहे. सप्ताह अखेरीस तुमच्या कामात हलगर्जीपणा करु नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. आरोग्याच्या काही तक्रारी या काळात जाणवतील.
अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, बुध, हर्षल, सप्तमस्थानात गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात भाग्यवर्धक घटनांची ठरु शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. तुमच्या कामात आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक जीवनात चांगल्या घटना शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यापार्यांना अनुकूल दिवस आहे मात्र अती दगदग त्रासाची ठरु शकेल. तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. सप्ताह अखेर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. पारमार्थिक उन्नतीसाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, षष्ठस्थानी गुरु, शुक्र आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र घटनांना असू शकेल. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सोमवार, मंगळवार भाग्यकारक घटनांचे ठरु शकतील. काहींना धनलाभ होतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सुख व समाधानाची अनुभूती होईल. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. आर्थिक स्थिती चांगली असेल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, हर्षल, पंचमस्थानात गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस विमा क्षेत्रातील लोकांना अनुकूल आहेत. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य. संशोधनकार्य, मानसशास्त्र, डेटा अॅनालिसिस किंवा रिकन्सिलेशन अशा कामांशी ज्यांचा संबंध आहे त्यांना उत्तम काळ आहे. धोका असलेली कामे मात्र या काळात टाळा. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कलाकार, विद्यार्थी, खेळाडू यांना अतिशय चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, बुध, हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल आणि बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवार संमिश्र आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासयोग येतील. मात्र तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतील. काळजी घ्यावी. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळा. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल.
उपासना: ’ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)