अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ मे ते २३ मे २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, बुध, हर्षल, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कलाकारांना त्यांच्या कलेत विशेष यश मिळेल. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना काळ चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येतील. विवाहोत्सूक असलेल्यांना विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. एखादं बक्षिस, वरीष्ठांकडून मिळालेली शाबासकी/ पदोन्नती/ पगारवाढ आनंदीत करु शकेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: गणपतीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, हर्षल, धनस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. संभाषणकौशल्यामुळे कामे होतील. गायकांना त्यांच्या कलेचा आनंद व मोबदला भरपूर मिळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. तुमच्या जोडीदाराला एखादी छानशी भेटवस्तू देऊन खूश करु शकाल. खर्चही यादरम्यान वाढते रहातील. सप्ताहाच्या मध्यामधे ग्रहमान संमिश्र आहे. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. मात्र परदेशासंबंधीत असलेल्या कामांमध्ये चांगले यश या दरम्यान मिळू शकेल.
सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, हर्षल आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात खर्च वाढतील. काही अनपेक्षित खर्चही अचानक सामोरे येतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना या काळात शक्य.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, हर्षल आणि लाभस्थानात गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकेल. भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने व्यावसायिक खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन रमेल. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, हर्षल, दशमस्थानात गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. शनिवारी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, भाग्यस्थानात गुरु, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मात्र याच काळात अचानक धनलाभाचे योग काहींना शक्य आहेत. विम्याचे किंवा आयकरसंबंधीत काम करणार्‍यांनाही चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. राजकारणी लोकांसाठी मनोनुकूल घटना जुळवून आणणारे ग्रहमान आहे. एखाद्या गोष्टीतील अचानक करावा लागलेला बदल किंवा परीवर्तन भविष्यकाळात फायदेशीर ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी व्यावसायिकांचे प्रलंबीत असलेले निर्णय मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, अष्टमस्थानात गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. याच्या बरोबर उलट काहींना अचानक धनलाभाचा संभव आहे. वारसा हक्काने किंवा विम्याद्वारे लाभ या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवास फायदेशीर ठरणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. एखादा धनलाभ, पगारवाढ, बढती अशा सुखद धक्का देणार्‍या घटना या काळात शक्य.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, बुध, हर्षल, सप्तमस्थानात गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. अती दगदग टाळा. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. काही लाभही होतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, षष्ठस्थानी गुरु, शुक्र आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही लाभदायक घटना शक्य. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. कलाकारांसाठी उत्तम यशाचा काळ आहे. विद्यार्थ्यांनाही कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. सप्ताहाच्या मध्यात काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन नोकरीच्या संधी शक्य आहेत. आहारतज्ञ, जीम ट्रेनर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, हर्षल, पंचमस्थानात गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला चांगले ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांना अनुकूल कालावधी आहे. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. कलाकारांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्याचा हा काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, बुध, हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राची बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल आणि मंगळाचा चंद्र व शुक्राशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्र व गुरुची युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात थोडीफ़ार गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र मोठी गुंतवणूक करायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)