अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ एप्रिल ते २ मे २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्य नोकरदारांसाठी चांगला आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्‍यांच्या बाबतीत काही अनुकूल घटना शक्य आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाचा मध्यानंतर कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. धनलाभाचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. जोडीदाराबाबत चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करू नका. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, हर्षल, धनस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहात जोखीम असलेली कामे टाळण्याची आणि बेकायदा गोष्टींपासून लांब राहण्याची गरज आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर होतील. घरातली शांतता बिघडणार नाही याचीही काळजी घावी. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. संततिसौख्य चांगले लाभेल. काहींना आर्थिक लाभ शक्य. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. सप्ताह मध्यानंतरचा कालावधी बेकारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. आर्थिक उन्नतीसाठीही काळ चांगला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना व वकीलांना उत्तम कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडे/ नातेवाईक यांच्या भेटीची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर मस्त पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा राहील. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी, पोटाचे/उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांची असेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. कार्यक्षेत्रात वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोगही शक्य. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात तुमच्या पराक्रमात वृध्दी होणार आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग येईल. आर्थिक सुयश लाभेल. प्रयत्नांची जोड दिल्यास एखादी अपूर्ण राहिलेली महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स यांना यशदायक काळ आहे. सप्ताह अखेरीस ग्रहमान प्रतिकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात शुक्र, हर्षल, दशमस्थानात गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाचा पूर्वार्ध तितकासा चांगला नाही. नंतर ग्रहमान अनुकूल होत जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीचे चार दिवस बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. वस्तू गहाळ होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. अचानक काही खर्च या दरम्यान उद्भवू शकतील. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर होतील. गुरुवार ते शनिवार हा कालावधी उत्तम असणार आहे. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभाचे योग येतील. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी मंगळ, बुध, शनि, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात शुक्र, हर्षल, भाग्यस्थानात गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य आहेत. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यानंतर दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग संभवतात. मात्र तुमच्या बोलण्यामुळे या काळात लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात मंगळ, बुध, शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, सप्तमस्थानात शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात गुरु आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राच्या किंवा परिचिताच्या ओळखीमुळे नोकरी मिळणे किंवा अन्य अडकलेली कामे मार्गी लावू शकाल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
उपासना: या काळात महादेवाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी शुक्र, हर्षल, सप्तमस्थानात गुरु आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे. मनासारखी खरेदी करु शकाल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी मंगळ, बुध, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठस्थानी गुरु आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. जोखीम असलेली कामे करु नका. नृत्य कलाकार, मानसोपचार तज्ञ, ज्योतिषी, सर्जन यांना मात्र हा कालावधी चांगला जाणार आहे. अचानकपणे लाभदायक स्थिती निर्माण होऊ शकेल. काहींना भविष्यकाळातील घटनांचे संकेत स्वप्नं किंवा अन्य प्रकारे मिळण्याची शक्यता आहे. ध्यानधारणा, मेडीटेशन या काळात मनाला वेगळीच उर्जा देऊ शकतील. सप्ताह मध्य भाग्यकारक घटनांचा ठरु शकेल. प्रवासयोग येतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात शुक्र, हर्षल, पंचमस्थानात गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही चांगला काळ आहे. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोगही शक्य आहेत. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य आहेत. संशोधन कार्य/ रेकी/ ज्योतिषशास्त्र/ सुजोक थेरपीशी संबंधीत ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, शनि, नेपचून, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शनि व मंगळाशी प्रतियोग होईल. ३० तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथेच त्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणाशीही वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैद्यकीय व्यावसायिक, वकील यांना मात्र या काळात फायदेशीर ग्रहमान आहे. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)