
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जिद्द व चिकाटी वाढेल. वरीष्ठ नाराज होतील असे वर्तन या दरम्यान टाळा. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांना तसेच आयात-निर्यातीच्या व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काही लाभ होतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. मन आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी कराल. जुनी येणी वसूल होतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. या काळात बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत रोज करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. यशाचं प्रमाण वाढल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठसुध्दा तुमच्या कामावर खुश असतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर पुन्हा धनलाभाचे योग येतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. सोमवार रात्रीपर्यंतचा कालावधी संमिश्र असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. या काळात वाहने सावकाश चालवावीत. मात्र याचदरम्यान काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विमा एजंट, मानसोपचारतज्ञ यांनाही अनुकूल कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. प्रसिध्दी मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. तब्येतीविषयक काही समस्या जाणवतील. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. विमा एजंट, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला वकील तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना काळ चांगला आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. जोडीदाराच्या काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्यायला हवे. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे. मात्र या काळात जोखीम असलेली कामे आज करु नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सप्ताहाचा शेवट संमिश्र असणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मात्र जोडीदाराशी वाद या काळात टाळावेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण चांगले राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात संमिश्र दिवस आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. स्पर्धा परीक्षेत यश कष्टाने मिळेल. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेशी काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकील यांना मात्र हाच काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. मधूमेह असणार्यांनी योग्य ते पथ्यपाणी या काळात सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस संशोधक, मानसोपचार तज्ञ, ज्योतिषी, थेरपिस्ट, रेकी हिलर यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. काहींना पॉपर्टीच्या विक्रीपासून लाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मुलांसाठी काही खरेदी कराल. ज्यांना परदेशात शिकायला जायचे आहे त्यांच्यासाठी काही अनुकूल घटना शक्य.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न करणार्या काही घटना शक्य आहेत. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक सुयश लाभेल. तुमच्या कला-कौशल्याला दाद मिळेल. मानसन्मान मिळेल. कौटुंबीक सौख्याचा हा काळ असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र डोळ्यांची व दातांची काळजी घेणे या दरम्यान गरजेचे आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. काही लाभ या काळात मनाला आनंद देतील.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात करणार्यांनाही हा काळ चांगला आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलाकारांना यशाचा काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांसोबत छान काळ जाईल. संभाषण कौशल्याच्या जोरावर एखाद्या कामात यश मिळेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मित्रमंडळी/ आवडत्या लोकांची भेट होऊ शकेल. एखादा धनलाभ सुखवून टाकेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शनि, नेपचून, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची मंगळ व बुधाशी युती होईल. १६ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १८ चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काही लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. एखाद्या मित्राकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून अडलेलं एखादं काम मार्गी लागू शकेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्यांनाही चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्यांना हा काळ चांगला आहे. विशेषत: वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांची आयात-निर्यात करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)