अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात बुध, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंत तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ छान जाईल. व्यावसायिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी संभवतील. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. याच काळात काहींना भविष्यदर्शक सूचक स्वप्ने पडू शकतील किंवा भविष्यकाळातील घटनांबाबत काही संकेत मिळू शकतील. सप्ताह मध्य लाभ देणारा आहे. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. सप्ताह अखेर संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात बुध, राहू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी आरोग्याची काळजी घ्या. त्यानंतरचे दोन दिवस घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. व्यावसायिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. आर्थिक सुयश लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्य संमिश्र असेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे बेत ठरवाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात बुध, राहू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवार दुपारपर्यंतचा काळ लाभदायक आहे. आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोक, वकील, जीम ट्रेनर तसेच आहारतज्ञ यांना चांगला लाभ मिळवून देईल. मात्र या दरम्यान तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडीटी/ मायग्रेन किंवा पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. जोखीम असलेली कामे या काळात टाळलेलीच बरी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. परीवर्तनाला तुम्ही तयार असाल तर हीच भविष्यातील लाभदायक संधी ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात बुध, राहू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. घरातल्या वडीलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळेल. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
धनलाभ होण्याचेही योग शक्य आहेत. सप्ताह मध्यात प्रतिकूल ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. कर्मचार्‍यांचे सहकार्य या दरम्यान मिळणार नाही. हितशत्रूंवरही लक्ष ठेवा. सप्ताह अखेर उत्तम आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: गणपतीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात बुध, राहू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी तुमच्या कला/ कौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. आत्मविश्वास वाढेल. काहींना प्रवास योग आहेत. नंतरचे दोन दिवस रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. खेळाडूंना हा काळ विशेष यशाचा असेल. ज्यांच्या पत्रिकेत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांच्यासाठी कदाचित हा काळ मोठे लाभ मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतील. वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे. तब्येतीची मात्र या दरम्यान काळजी घ्यायला हवी.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी बुध, राहू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. लाभ होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. परदेशात शिकायला जाण्याची इच्छा असणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. या दरम्यान खर्च मात्र वाढणार आहेत. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह मध्यानंतर घरात छान वातावरण असेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार फायदेशीर ठरु शकतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना संमिश्र काळ आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात बुध, राहू, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल. नंतरचे दोन दिवस आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात चांगले ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. नवीन परिचय होतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज दत्तबवनी म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, राहू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. खर्चही वाढणार आहेत. मनोरंजनाकडे कल राहील. नंतरचे दोन दिवस अनुकूल आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमचे सहकारी मदत करतील. मात्र हितशत्रूंवर दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र बोलण्यावर संयम ठेवावा. जोखीम असलेली कामे टाळा. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वार्तालाप होईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासयोग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी बुध, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. त्या नंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्य लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात बुध, राहू, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. रविवारी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. नंतरचे दोन दिवस व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह मध्यात मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्‍यांना खूप चांगला कालावधी आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. तब्येतीची मात्र या दरम्यान काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताह अखेरीस मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, राहू, धनस्थानात सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. नोकरीत, व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. व्यवसायिकांना भरपूर लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना यश देणारा काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, शनि, नेपचून, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे टाळा. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. नंतरचे दोन दिवस भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ होण्याचे योग आहेत. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)