
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ मार्च ते २८ मार्च २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात मंगळ, बुध, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभ होण्याची शक्यता आहे. संभाषण कौशल्याच्या जोरावर एखाद्या कामात चांगले यश मिळेल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. खरेदीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र वस्तू गहाळ होणार नाहीत याची यादरम्यान दक्षता घ्यावी. गुंतवणूक नव्याने करायची असेल तर त्यासाठी काही काळ थांबलेले बरे. सप्ताह मध्यानंतर कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, कलाकार व वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात मंगळ, बुध, राहू आणि लाभस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी खर्चाचे प्रमाण वाढेल. मनासारखी खरेदी होईल. मनोरंजनाकडे कल राहील. तुमचा काही छंद असेल तर तर त्यासाठी जरुर वेळ द्या. नंतरचे दोन दिवस मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यात कामात सुयश लाभेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमच्या उत्तम नियोजनामुळे महत्वाची कामे पार पाडाल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यानंतर कवी, लेखक यांच्यासाठी हा कालावधी मस्त असेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात मंगळ, बुध, राहू, दशमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या भेटीचे योग येतील. खिशात पैसे भरपूर खुळखुळत असल्याने चांगली खरेदी कराल. मौज-मजा करण्याकडे कल असेल. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी हा कालावधी खूप चांगला आहे. काही चांगले अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी संभाषण कौशल्याच्या जोरावर काही कामे मार्गी लावू शकाल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. काही लाभही या काळात शक्य.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात मंगळ, बुध, राहू, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात वरीष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर त्यांच्याकडे आता शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने आनंदी असाल. आवडत्या लोकांची भेट होईल. काही लाभही होतील. सप्ताह मध्यानंतर पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामे मार्गी लागतील.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात मंगळ, बुध, राहू, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक काळ आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सासूरवाडीच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. वरीष्ठ खुश असतील. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक सुयश लाभेल. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग येतील. लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी मंगळ, बुध, राहू, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारी वाहने जपून चालवावीत. लेखक/ ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. नंतरचे दोन दिवस उपासना करण्यार्यांना चांगले आहेत मात्र आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात मंगळ, बुध, राहू, षष्ठस्थानी सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काही लाभही होऊ शकतील. भागीदारीतील व्यवहार चांगला फायदा या काळात मिळवून देण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र असणार आहेत. वाहने जपून चालवा. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांच्यासाठी मात्र हा काळ अनुकूल घटनांचा ठरणार आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास शक्य आहे. प्रवासाचे बेत मनात घोळायला लागतील. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात मंगळ, बुध, राहू, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीचा काळ नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना सुसंधी देणारा ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र या काळात डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी चांगला आहे. काही लाभही संभवतात. आर्थिक स्थिती चांगली असेल. एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. काहींना सूचक स्वप्न पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकीत करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी मंगळ, बुध, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना छान कालावधी आहे. उपासनेसाठीही हा कालावधी चांगला आहे. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. नंतरच्या दोन दिवसात वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ व केमिस्ट यांना अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करायचा असेल तर हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताहाचा शेवट मानसिक चिंतेचा असू शकेल. जोखीम असलेली कामे टाळा.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात मंगळ, बुध, राहू, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आनंद देणारा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात भाग घ्याल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात जिद्द वाढेल. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वैद्यकीय व्यवसायातील लोक, केमिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. मात्र आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतील. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, राहू, धनस्थानात सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या पराक्रमात वृध्दी करणारे ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. या काळात केलेले प्रवास फायदेशीर ठरु शकतील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. काहींना आर्थिक लाभ शक्य. सप्ताहाच्या शेवटी नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल व चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र आपल्या चीजवस्तू सांभाळा. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत याचीही दक्षता या दरम्यान घ्या. सप्ताह मध्यात भावंडांशी भेट होईल किंवा त्यांच्याशी संपर्क साधाल. कामात सुयश लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या नवीन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)