अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल ग्रहमान आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात धनलाभाची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. गायकांना काही नवीन संधी मिळू शकतील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर ब्लॉगर्स, लेखक, खेळाडू व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रवासयोगही शक्य. परदेशप्रवासासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटीची कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. परदेशगमन किंवा लांबच्या प्रवासाचे बेत मनात असतील तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. एकंदरीतच लाभदायक ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यानंतर छान मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. संततीसाठी तसेच आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ काढा. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोगही शक्य.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात मंगळ, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभाची शक्यता आहे. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशगमन ज्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात काही संधी येतील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. धार्मिक कार्यात सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताह मध्यात व मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यापार्‍यांना अनुकूल काळ आहे मात्र अती दगदग त्रासाची ठरु शकेल. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव या दरम्यान येण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीवर अती विश्वास टाकणे या काळात नुकसानीचे ठरु शकेल. काळजी घ्यावी. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताह अखेर ग्रहमानात सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी मंगळ, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवास योगही या काळात शक्य. मात्र या दरम्यान अ‍ॅसिडिटी/ पोटाचे काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे लागेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम होणार आहे. वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभाची शक्यता आहे. संगणक क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक योग आहेत. मित्रांशी संपर्क होईल. मन प्रसन्न असेल. शनिवारी खरेदीसाठी चांगला सूर लागू शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात मंगळ, प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, बुध, शुक्र, राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताहाचे पहिले दोन दिवस वाहने जपून चालवा. कोणत्याही गोष्टीची जोखीम या अवधीत टाळलेली बरी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. काही लाभदायक घटना घडू शकतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यापार्‍यांना अनुकूल काळ आहे मात्र अती दगदग त्रासाची ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली असेल. लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. विम्यासंबंधीत काम करणार्‍यांना कालावधी चांगला आहे. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही शक्य आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. व्यापार्‍यांना काळ चांगला आहे मात्र अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. या दरम्यान रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी वाद संभवतात. काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट सामान्य आहे. गूढ गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील. शनिवारी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व) आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. काही लाभही या काळात होऊ शकतील. सप्ताह मध्यात तुमच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. फ़िजिकल फ़िटनेस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र काळ अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या किंवा नोकरीबदल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, प्लूटो, धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व) आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रॉपटीची कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. कलाकारांना हा कालावधी विशेष यशदायक आहे. सप्ताह अखेरीस नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे व वकिल यांना ग्रहमान अनुकूल आहे. तब्येतीला मात्र या काळात जपावे.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात मंगळ, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कामात यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. प्रवासात काळजी घ्या. परदेशगमनासाठी किंवा परदेशाशी संबंधित व्यवहारांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटीची कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. कलाकारांना हा कालावधी विशेष यशदायक आहे. सप्ताह अखेरीस नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे व वकिल यांना ग्रहमान अनुकूल आहे. शनिवारी तब्येतीला जपावे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राचा बुध, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २८ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव या काळात शक्य आहेत. प्रवासातही काळ्जी घेणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)