
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो, लाभस्थानात बुध, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा काळ लाभदायक आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही कालावधी अनुकूल आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी काळ चांगला असेल. मात्र या काळात वाहने जपून चालवावीत. कोणतेही जोखीम सध्या नको. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग येतील. वरीष्ठांची मर्जी राहिल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांची नाराजी होईल असे वर्तन टाळा. गुंतवणूक करत असाल तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो, दशमस्थानात बुध, शुक्र, राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवत रहातील. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. संशोधक, ज्योतिषी, अध्यात्म मार्गातील साधक यांच्यासाठी हा काळ विशेष यशाचा ठरु शकेल. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला असेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो, भाग्यस्थानात बुध, शुक्र, राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल आहेत. मात्र अॅसिडिटी/ पोटासंबंधी ज्यांना काही त्रास असतील त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो, अष्टमस्थानात बुध, शुक्र, राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात भाग घ्याल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस, पदोन्नती, धनलाभ किंवा वरीष्ठांकडून मिळालेली शाबासकी सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. खेळाडूंना हा काळ विशेष यश देणारा ठरु शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. मधूमेह असणार्यांनी या काळात योग्य त्ते पथ्यपाणी सांभाळले पाहिजे. वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, प्लूटो, सप्तमस्थानात बुध, शुक्र, राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कलाकौशल्याला वाव मिळेल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. या काळात केलेले प्रवास चांगला फायदा देऊ शकतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवा. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीची काळजी घ्या आणि जोडीदाराबरोबर वाद टाळा.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो, षष्ठस्थानी बुध, शुक्र, राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात चांगल्या घटनांनी होईल. काहींना लाभ होऊ शकतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यात मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर शेअर केलेल्या एखाद्या पोस्टमुळे प्रसिध्दी किंवा काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह अखेर लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो, पंचमस्थानात बुध, शुक्र, राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली असणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. तुमच्या संभाषण कौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. सप्ताहाच्या अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: ’’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. तुमच्या घराच्या सजावटीसाठी किंवा डागडुजीसाठी काही खर्च होऊ शकेल. मौज-मजा/ मनोरंजनाकडे कल राहील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. नृत्यकलेशी संबंधीत असणार्यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभही होतील. उपासनेत मन लागेल. गुरुकृपा लाभेल. मात्र या दरम्यान तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. अॅसिडीटी किंवा पोटाचे काही त्रास असतील तर योग्य ते पथ्य या काळात नक्कीच पाळायला पाहिजे. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ शक्य आहेत. मात्र तुमच्या बोलण्यामुळे या दरम्यान लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो, तृतीयस्थानी बुध, शुक्र, राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व) आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. या काळात केलेले प्रवासही फायदेशीर ठरतील. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहे. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, प्लूटो, धनस्थानात बुध, शुक्र, राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व) आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादा छंद किंवा एखादी हौस पुरवून घ्याल. काही लाभ होण्याचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर नृत्य कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक गोष्टींसाठीही ग्रहांची अनुकूलता आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. या काळात प्रवास लाभदायक ठरू शकतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग या काळात शक्य. लाभदायक घटनांचा काळ आहे. सप्ताह मध्यात वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र कोणत्याही वादापासून लांब रहा. अती दगदग टाळा. तसेच तब्येतीची काळजी घेणे या काळात आवश्यक आहे. अॅसिडिटी, पोटाचे काही त्रास असतील तर योग्य ते पथ्य आवश्यक आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांशी/ नातेवाईकांशी संपर्क साधाल. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस अचानक काही खर्च करावे लागतील. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला सूर्य कुंभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शुक्र व बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. धनलाभ अपेक्षित असतील तर त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)