अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टी खरेदी किंवा विकण्यासाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाचा मध्यात तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थी व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. हा काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, डेटा अ‍ॅनालिस्ट, संशोधक, ज्योतिषी यांना खूप चांगला ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी कायदेविषयक कामांसाठी अनुकूल काळ आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही नवीन संधी मिळू शकतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. या काळात तुमच्या तब्येतीची मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. तुमच्या हातुन काहीतरी छान काम होईल. लोकांच्या कौतुकाला पात्र व्हाल. सप्ताह मध्यात लाभ देणारं ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिकांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. परदेशात शिक्षणासाठी जायचे असेल तर त्यासंबंधी माहिती मिळविणे किंवा परदेशात कायमच्या निवासासाठी अर्ज करावयाचा असेल तर त्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वेळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. चमचमीत पदार्थ खायला तुम्हाला नेहमीच आवडतं. एखाद्या खाऊगल्लीला कुटुंबीयांसमवेत जरुर भेट द्या. सप्ताह मध्यात कार्यालयीन कामासाठी तुम्हाला प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात आपल्या चीजवस्तू सांभाळा तसेच स्वत: वाहन चालविणार असाल तर सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. तुमच्या मुलांशी संवाद साधा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना या काळात गरज पडू शकते.
उपासना: ’ ॐ नम: शिवाय ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. आवडीच्या पदार्थांवर मस्त ताव माराल. मात्र खाण्यापिण्यावर थोडा संयम या काळात बाळगायला हवा तसेच डोळ्यांची काळजी या काळात घ्यावी. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी असाल.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. कोणत्यातरी चिंता मनाला विनाकारण सतावत राहतील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. तुमच्या बोलण्यामुळे या दरम्यान लोकं दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताहाच्या शेवटी नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. प्रवासाचे बेत शक्य आहेत. मात्र प्रवासात योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. अती दगदग टाळा. कागदपत्रांसंबंधी असलेल्या कामांमध्ये या काळात चुका होणार नाहीत यांची दक्षता घ्या.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात काही खर्च अचानक सामोरे येतील. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. खरेदीसाठी तसेच परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट
लाभदायक आहे. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने तेही खूष असतील. सप्ताह मध्यात ग्रहांची अनुकूलता अजूनच वाढणार आहे. लाभदायक घटना घडतील. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळेल. जोडीदारासाठी काही खरेदी कराल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळायला लागतील. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काम होईल. प्रसिध्दी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. या काळात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व) आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाचा तोल जाऊ देऊ नका. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्यात कौटुंबीक सौख्य मिळेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे योगही या दरम्यान शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. मानसन्मान मिळेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. लाभदायक काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व) आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. मस्त पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. संशोधक, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. काहींना या काळात भावी आयुष्याबाबत सूचक स्वप्ने पडतील किंवा शुभ संकेत जाणवायला लागतील. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. धार्मिक गोष्टीत मन रमेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा कालावधी अनुकूल आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात आर्थिक जोखीम टाळा. या दरम्यान कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. खरेदीसाठी मात्र काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करु नका. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. ज्योतिषी/ विमा व्यवसायिकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य व मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ६ तारखेला शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वकील, फार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. भाग्यवर्धक घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)