
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी अचानकपणे काही खर्च करावे लागू शकतील. पारमार्थिक उन्नतीसाठी मात्र चांगला दिवस आहे. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक स्थिती असेल. प्रलंबीत असलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. सप्ताह मध्य आर्थिक उत्कर्षाचा असू शकेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग शक्य. मात्र या दरम्यान अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. मनासारखी खरेदी होऊ शकेल. परदेशगमन करायचे असेल किंवा परदेशासंबंधीत इतर काही व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर त्यांना आता गती मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभही शक्य आहेत.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी कार्यक्षेत्रात छान काम झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. वरीष्ठ खुष असणार आहेत. त्यानंतरचे चार दिवस संमिश्र आहेत. मनासारख्या खरेदीचे योग आहेत. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. परदेशासंबंधीच्या गोष्टींसाठीही अनुकूलता आहे. मात्र याच दरम्यान काही अचानक उभे राहिलेले खर्च चिडचीड वाढवणार आहेत. कोणतीही नविन गुंतवणूक सध्या न केलेली बरी. गुंतवणूक करणे आवश्यक असल्यास तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरुर घ्यावा. विद्यार्थ्यांनी या काळात अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. नशिबाची साथ मिळेल. नंतरचे दोन दिवस दिवस अनुकूल आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. व्यावसायिकांचे प्रलंबीत असलेले निर्णय मार्गी लागतील. सप्ताह मध्यात व नंतर लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. घरात छान वातावरण असेल. मित्रांशी किंवा आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस थोडा प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. धार्मिक गोष्टींसाठी किंवा उपासनेसाठी चांगला काळ आहे. मात्र या काळात आपली मतं दुसर्यांवर लादू नका. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यात व नंतर तुमच्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. मात्र संपूर्ण काळात तुम्हाला वरीष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी संशोधक, एडीटींग, म्युझिक डायरेक्टर, ज्योतिषी, विमा व्यावसायिक तसेच एआयच्या क्षेत्रातील लोकांना फयदेशीर काळ आहे. यादरम्यान भविष्यातील घटनांचे संकेत तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्यांना ज्योतिष, रेकी, मानसशास्त्र असे विषय शिकायचे असतील त्यांना ग्रहस्थिती अनुकूल आहे. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र जोखीम असलेली कामे य दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताह मध्यानंतर भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनुकूल दिवस आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही लाभ होतील. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगला कालावधी आहे. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांनाही हा कालावधी चांगला आहे मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी चांगला असणार आहे. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताह मध्यानंतर ज्य़ोतिषी, सर्जन, रेकी मास्टर, विमा प्रतिनिधी यांना कालावधी चांगला असेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला कालावधी आहे. एखादा विषय शिकायला सुरुवात करायची असेल तर किंवा आपल्या छंदात काहीतरी नव्याने करावेसे वाटत असेल तर त्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व) आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काळ चांगला आहे. रविवारी घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. त्यानंतरचे दोन दिवस धनलाभ तसेच संततीसौख्याचे आहेत. नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रेमिकांना विवाह ठरविण्यासाठी हा कालावधी अनुकूल अनुकूल ठरु शकेल. सप्ताह मध्यात नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. वकील, आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठीही ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्याच्या काही समस्या असतील तर तिकडे मात्र दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व) आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उत्तम आहे. लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रातही सुसंधी लाभेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी ग्रहमान चांगले आहे. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र या दरम्यान अती दगदग टाळा.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी चांगले ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वादग्रस्त लेखन या दरम्यान सोशल मिडियावर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव शक्य. प्रवासात काळजी घ्या. नृत्य कलाकारांना मात्र छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. परदेशगमन ज्यांना करायचे असेल त्यांना मात्र हा काळ अनुकूल ठरणार आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह उत्तम असणार आहे. रविवारी कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. त्यानंतरचे दोन दिवस विशेष लाभ देणारे आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. एखाद्या खाऊगल्लीला आपल्या जिवलगांबरोबर फेरफटका मारुन यायला हरकत नाही. सप्ताह मध्यात नोकरीसाठी प्रवासयोग शक्य आहेत. भावंडांच्या भेटीचे योग येतील. हातून दर्जेदार लेखन होईल. संशोधक, लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताह अखेरीस कौटुंबीक सौख्य लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)