अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभही होतील. उपासनेत मन लागेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांनाही चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी कामे मार्गी लागतील. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योगही शक्य.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. कौटुंबीक सौख्य मिळेल. गुरुजनांचे/ वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यात खर्च वाढणार आहेत. जोडीदारासाठी काही खरेदी कराल. बेकायदा गोष्टी मात्र या काळात कटाक्षाने टाळाव्यात. याच काळात काहींना पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून अचानक फायदा शक्य आहे. लेखक, प्रकाशक, ज्योतिषी यांनाही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभाचे योग आहेत. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. छान लाभ होतील. मानसन्मान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.
उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे. सप्ताह मध्य उत्तम असणार आहे. मनासारखे पैसे मिळतील. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र खर्चही वाढणार आहेत. परदेशाशी ज्यांचे व्यवहार आहेत त्यांना काही फायदा संभवेल. ध्यानधारणा/ मेडीटेशनने मनाला शांती मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. मनोरंजनाकडे कल राहील. मात्र खर्चाचे प्रमाणही वाढेल. नंतरचे दोन दिवस अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. वरीष्ठांना दुखवणे किंवा कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. बेकायदा गोष्टीही टाळा. सप्ताह मध्यात व नंतर लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. मात्र या दरम्यान एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस थोडा प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. धार्मिक गोष्टींसाठी किंवा उपासनेसाठी चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. कलेच्या क्षेत्रातील लोकांना विशेष चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. व्यापार्‍यांनाही अनुकूल ग्रहमान आ्हे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. संशोधक, सर्जन, राजकारणी, विमा व्यावसायिकांना मात्र याच काळात चांगले यश मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरु शकतील. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांनाही हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मात्र ज्य़ोतिषी, सर्जन, रेकी मास्टर, विमा प्रतिनिधी यांना हाच कालावधी चांगला असेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळा. त्यांना तुमच्या मदतीची गरज तर नाहीना याची चौकशी करा. प्रेमिकांनाही हा काळ प्रतिकूल आहे. या काळात गैरसमज होईल असे वर्तन टाळावे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी पूरक आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे काही त्रास असतील त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व), नवमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात ग्रहमान उत्तम आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), अष्टमस्थानात केतू आणि लाभस्थानात बुध, व्ययस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. तुमच्या चांगल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. मात्र सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासात काळजी घ्या. सप्ताह मध्यात हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे आज कल असेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह अखेरीस संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. परदेशाशी संबंधीत कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानी केतू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी झालेला संपर्क आनंददायक ठरेल. लेखकांना ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. खेळाडू तसेच कलाकार छान प्रगती करतील. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मानसन्मानाचेही योग आहेत.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, नवमस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला बुध धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीचे दिवस सुखाचे ठरु शकतील. मन आनंदी राहील. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. नोकरीसाठी प्रवासयोग शक्य आहेत. हातून दर्जेदार लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे.
सप्ताह अखेरीस भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)