
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्यासही हा कालावधी चांगला आहे. प्रवासयोग शक्य. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून या काळात फायदा होऊ शकेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग येऊ शकतील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर वेळ छान जाईल. जुनी येणी वसूल होतील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना यादरम्यान चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना हा संपूर्ण सप्ताहच विशेष अनुभुतीचा ठरु शकेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा ’जय शंकर’ या मंत्राचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. या काळात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योगही काहींना याच काळात अनुभवायला मिळू शकतील. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना घडतील. मनोबल उत्तम राहील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस बर्याच काळापासून अपूर्ण राहिलेली एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल.
उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना घडेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवासात खिसे/ पाकिट सांभाळा. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. तुमची धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात चुका होणार नाहीत तसेच कोणत्याही कारणामुळे वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्या. या दरम्यान खर्चही वाढतील. कामाचा ताण जाणवेल. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर करायला मदत होईल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. वकील, आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना हा काळ विशेष चांगला आहे. तब्येतीच्या तक्रारी मात्र जाणवत रहातील. मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. व्यापार्यांनी मोठे धोके या काळात घेऊ नयेत. सप्ताह मध्यानंतर दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम असणार आहे. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. वाहने जपून चालवा.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. कर्ज प्रकरणे मंजुर होण्यासाठी कालावधी अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी प्रॉपर्टीची जागा व कागदपत्रे आधी तज्ञ व्यक्तीला दाखवून मगच व्यवहार करावा. सप्ताह मध्यानंतर ग्रहमान संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताह अखेरीस शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कौटुंबीक सौख्य मिळेल. छान मेजवानीचे योग येतील. लाभदायक घटना घडतील. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात नशिबाची साथ मिळेल. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी कराल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह अखेर संततीचे प्रश्न मार्गी लागतील. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात रोज दत्तबावनी म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व), नवमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे व्यवहार करायचे मनात असेल तर काही अनुकूल संधी चालुन येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची खुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), अष्टमस्थानात केतू आणि लाभस्थानात बुध, व्ययस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना फायदेशीर काळ आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान चांगले आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. प्रवासयोगही शक्य. सप्ताह अखेरीस धनलाभाचे योग आहेत. घरातील वातावरण छान असेल. आप्तस्वकीयांना घरी बोलावून छान पार्टी करता येईल.
उपासना: या कालावधीत ’हनुमान चालिसा’ किंवा ’मारुती स्तोत्र’ रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानी केतू, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडिटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. पूर्वीच्या गुंतवणुकी चांगला फायदा देऊ शकतील. परदेशासंबंधीत कामांसाठी हा कालावधी चांगला असणार आहे. मात्र याच काळात काही अनावश्यक खर्चही डोके वर काढतील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न राहील.
उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ किंवा ’श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा रोज जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, नवमस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग तर शनिचा शुक्राशी केंद्रयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा हा कालावधी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)