अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र कालावधी आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक उन्नतीसाठी लोकांना चांगला काळ आहे. मात्र या दरम्यान काही खर्च अचानकपणे समोर येतील. बेकायदा गोष्टींपासून कटाक्षाने लांब रहावे. सप्ताहाच्या मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकला. जोखीम असलेली कामे करु नका. अपघातभय आहे. वाहने जपून चालवा. काहींना कामाचा ताण जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकला. सप्ताहाच्या मध्यानंतर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. डोळे/ दातदुखीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या उत्तम नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सोशल मिडीयाच्या माध्यामातून यश संभवेल. लेखक, प्रकाशक, ज्योतिषी यांनाही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या मध्यात खर्च वाढणार आहेत. जोडीदारासाठी काही खरेदी कराल. बेकायदा गोष्टी मात्र या काळात कटाक्षाने टाळाव्यात. याच काळात काहींना पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून अचानक फायदा शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील.
उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. चांगला काळ आहे. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. सप्ताह मध्य संमिश्र असणार आहे. मनासारखे पैसे मिळतील. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. मात्र अती दगदग या काळात टाळा. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. खर्चही वाढणार आहेत. कर्ज प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यात आता प्रगती दिसेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून आणि लाभस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मधूमेह असणार्‍यांनी मात्र या काळात पथ्यपाणी सांभाळायला हवे. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढेल. लोकांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम झाल्यामुळे खुष असाल. काहींना नवीन संधी चालून येतील. प्रसिध्दी मिळेल. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक कार्यात सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र या काळात जोखीम असलेली कामे करु नका. तुमच्याकडे असलेले डावपेच कौशल्य यावेळी उपयोगी पडेल. राजकारणी लोकांना लाभ होतील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. प्रवासाचे योग संभवतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. वरीष्ठ तुमच्यावर या दरम्यान नवीन जबाबदारी सोपवू शकतात. हे काम तुम्हाला आनंद व सन्मान देऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. प्रेमिकांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी काळ उत्तम आहे. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्य संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. धार्मिक कार्यामधील सहभाग मनातील नकारात्मकता दूर करायला मदत करेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी सूर्य, मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. मात्र तब्येतीची काळजी या काळात घ्यायला हवी. सप्ताह मध्य जोडीदाराबरोबर आनंदात जाणार आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना काही फायदेशीर संधी चलून येतील. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह अखेर संमिश्र असू शकेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र या काळात वाहने जपून चालवा. जोखीम असलेले कोणतेही काम करु नका.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान चांगलं आहे. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मनाला सुखावून टाकेल. विद्यार्थी, कलाकार व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे काही त्रास असतील त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. वैहाहिक सौख्य मिळेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व), नवमस्थानात केतू, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. य़ाउलट अध्यात्मिक क्षेत्रात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, वकील यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. काही लाभही होतील.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. काहींना प्रवास योग आहेत. लोकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या चांगल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. कागदपत्रांच्या संबंधीत काही कामे प्रलंबित असतील तर त्याच्या पूर्ततेसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात व नंतर कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. खेळाडूंना व कलाकारांना विशेष यशाचा काळ असेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानी केतू, नवमस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. एखाद्या खाऊगल्लीत तुमच्या मित्रांसोबत फेरफटका मारायला हरकत नाही. सप्ताह मध्यात प्रवासयोग आहेत. आत्मविश्वास वाढेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. घरामध्ये छान वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ होण्याचे योग आहेत.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, नवमस्थानात सूर्य, मंगळ, शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु व शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल आणि गुरु वक्री होईल. ६ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि लगेच त्याचा गुरुशी प्रतियोग होईल
फलादेश- एकंदरीतच पूर्ण सप्ताह तुम्हाला चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना संभवतात. मन आनंदी राहील. नशीबाची साथ मिळेल. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यही तुम्हाला अनुकूल असणार आहे. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. आर्थिक सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक काळ आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)