अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ जून ते ५ जुलै २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्य वकील, नेते, फ़ार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना तसेच नोकरीबदल करायची इच्छा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ संभवतात. तब्येतीची मात्र या दरम्यान काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल किंवा त्याचा उत्कर्ष या काळात शक्य. एखाद्या खाऊगल्लीला आपल्या जिवलगांबरोबर फेरफटका मारुन यायला हरकत नाही.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी सूर्य, गुरु, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभ होण्याचे योग आहेत. घरातील वातावरण चांगले राहील. एखाद्या पार्टी किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. बांधकाम व्यावसायिक तसेच प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. संततिसौख्य लाभेल. काहींना आर्थिक लाभ शक्य. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले यश देणारे ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच थेरपिस्ट, आहारतज्ञ, फिजिकल फिटनेसशी संबंधीत असणार्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: रामरक्षेचे पठण या काळात रोज करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी मंगळ, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. लांबच्या प्रवासाचे योग मनात घोळत रहातील. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर संमिश्र दिवस आहे. तुमच्या संततीला तुमच्या मदतीची गरज तर नाही ना याची खातरजमा करुन घ्या. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. परदेशगमनासाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानी मंगळ, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. गुंतवणूकीसाठी कालावधी अनुकूल आहे. मात्र आपल्या बोलण्यामुळे आज लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. खाण्यापिण्यावरही संयम ठेवायला हवा. काही खर्च अचानकपणे समोर उभे राहू शकतील. काही लाभ होता होता राहून जाण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कामात सुयश लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. घरात छान वातावरण असेल. मौज-मजेचे प्रसंग घडतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरीष्ठ तुमच्यावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता त्यांच्याकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळणार आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या काही महत्वाकांक्षा पूर्ण होतील किंवा त्यादृष्टीने काही सकारात्मक बदल दिसायला लागतील. आवडत्या व्य्क्तींबरोबर वेळ मजेत जाणार आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. बोलण्यावर संयम ठेवावा. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. खरेदीसाठी मात्र चांगला सूर लागू शकेल. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव या दरम्यान येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रवासाचे योग आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात सूर्य, गुरु, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची होण्याची शक्यता आहे. काही खर्च अचानक समोर येण्याची शक्यता आहे. बेकायदा असलेली कोणतीही कामे या काळात करु नका. खरेदीसाठी मात्र काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. परदेशाशी ज्यांचे व्यवहारीक संबंध आहेत त्यांना काही फायदा देंणार्या संधी चालून येऊ शकतील. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह अखेर कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखाद्या खाऊगल्लीत आपल्या कुटुंबीयांबरोबर किंवा मित्रांबरोबर जरुर फेरफटका मारायला हरकत नाही.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. कार्यक्षेत्रात छान काम होईल. धनलाभ संभवतो. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा शक्य आहे. परदेशाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना फ़ायदेशीर काळ आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, भाग्यस्थानात बुध आणि दशमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मन प्रसन्न असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काहींना कामानिमित्त प्रवासयोग येऊ शकतात. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. धनलाभ होईल. मात्र एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करतांना योग्य ती काळजी घ्यावी. संशोधक, विमा व्यावसायिक, खाजगी गुप्तहेर यांना हाच काळ चांगला फायदा मिळवून देणारा ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवट छान खरेदीचा ठरु शकेल. पती/ पत्नीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. नृत्यकलेशी संबंधीतांना यश देणारा कालावधी ठरेल. आयात-निर्यात करणार्या व्यापारांना एखाद्या व्यवहारातून मोठा फायदा मिळू शकेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, अष्टमस्थानात बुध आणि नवमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात संमिश्र दिवस आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यापार्यांना अनुकूल दिवस आहे मात्र अती दगदग त्रासाची ठरु शकेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही होतील. मात्र या द्ररम्यान एखाद्या व्यक्तीचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्या तसेच आपले आरोग्य या काळात सांभाळा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, सप्तमस्थानात बुध आणि अष्टमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. याउलट काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाचा शेवट छान असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खुष असतील. प्रमोशन/ पगारवाढ/ बदली यासाठी वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. काही लाभही या काळात शक्य. विद्यार्थी व कलाकारांना उत्तम यशाची ग्वाही देणारा काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात सूर्य, गुरु, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. वैवाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. काही लाभही या काळात संभव आहेत. तब्येत मात्र सांभाळणे या काळात आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती उत्तम आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य. प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. घरात मित्रमंडळी किंवा नातेवाईकांबरोबर मस्त पार्टी किंवा एखादी सहल आयोजित करु शकाल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय/ सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीच्या शोधात असणार्यांना तसेच नोकरी बदलू इच्छिणार्यांसाठी काही संधी चालून येतील. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीची मात्र या काळात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताह अखेर अचानक धनलाभाची असू शकेल. विमा, मानसोपचारतज्ञ या क्षेत्रात काम करणार्यांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)