अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ जून ते २१ जून २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, पंचमस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायात किंवा नोकरीत चांगले काम झाल्याने वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ शाबासकीची एखादी थाप मिळू शकेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यात काही लाभ होतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. जुन्या आठवणींमध्ये मन रमेल. मन आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी कराल. जुनी येणी वसूल होतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवासयोग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी सूर्य, बुध, गुरु, चतुर्थस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. यशाचं प्रमाण वाढल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठसुध्दा तुमच्या कामावर खुश असतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर पुन्हा धनलाभाचे योग येतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. मनोरंजनाकडे कल राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, तृतीयस्थानी मंगळ, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. सोमवार रात्रीपर्यंतचा कालावधी संमिश्र असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. या काळात वाहने सावकाश चालवावीत. मात्र याचदरम्यान काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सर्जन, ज्योतिषी, संशोधक, खजगी गुप्तहेर, विमा एजंट, मानसोपचारतज्ञ यांनाही अनुकूल कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताह मध्यात खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. खरेदीसाठी मात्र चांगला सूर लागू शकेल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी पैशांची कामे लांबू शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी भागीदाराला कोणत्याही बाबतीत गृहीत धरु नका. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताहाच्या मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. तब्येतीविषयक काही समस्या जाणवतील. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. विमा एजंट, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला वकील तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना काळ चांगला आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सप्ताहाचा शेवट संमिश्र असणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मात्र जोडीदाराशी वाद या काळात टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि लाभस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण चांगले राहील. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेशी काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकील यांना मात्र हाच काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. मधूमेह असणार्यांनी योग्य ते पथ्यपाणी या काळात सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि दशमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस लाभदायक कालावधी आहे. अचानक धनलाभाचे योग पत्रिकेत असतील तर या काळात चांगला लाभ होणे शक्य. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना यशदायक ग्रहमान आहे. शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारातून फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र तज्ञांचा सल्ला घेऊनच व्यवहार करावेत.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि नवमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. काहींना प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताहाच्या शेवटी मुलांसाठी काही खरेदी कराल. ज्यांना परदेशात शिकायला जायचे आहे त्यांच्यासाठी काही अनुकूल घटना शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, बुध, गुरु आणि अष्टमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न करणार्या काही घटना शक्य आहेत. धनलाभ होण्याचे योग आहेत. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक सुयश लाभेल. तुमच्यातल्या कला-कौशल्याला दाद मिळेल. मानसन्मान मिळेल. कौटुंबीक सौख्याचा हा काळ असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र डोळ्यांची व दातांची या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाशीही झालेले वाद दीर्घकालीन नुकसानीचे ठरु शकतील. काळजी घ्या, या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, सप्तमस्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. काही अचानक खर्चही या काळात उद्भवू शकतात. आयात-निर्यात करणार्यांना हा काळ चांगला आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलाकारांना यशाचा काळ आहे. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताह अखेर कुटुंबीयांसोबत छान जाईल. संभाषण कौशल्याच्या जोरावर एखाद्या कामात यश मिळेल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, षष्ठस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि मंगळ-शनि षडाष्टक होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काही लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. एखाद्या मित्राकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून अडलेलं एखादं काम होऊ शकेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्यांनाही चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्यांना हा काळ चांगला आहे. विशेषत: वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांची आयात-निर्यात करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. काहींना प्रवास योग शक्य आहेत. सप्ताह अखेरीस काही लाभदायक घटना शक्य. धनलाभ होण्याचे योग आहेत. मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)