अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ जून ते १४ जून २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी सूर्य, हर्षल, तृतीयस्थानी बुध, गुरु, पंचमस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंतचा काळ लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवा. कोणतीही जोखीम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, शास्त्रज्ञ, सिआयडी/ खाजगी गुप्तहेर यांच्यासाठी मात्र हाच काळ चांगला असेल. काहींना अचानक धनलाभ या काळात शक्य होईल. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट सामान्य आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. वरीष्ठांची नाराजी होईल असे वर्तन टाळा. गुढगेदुखी असणार्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, हर्षल, धनस्थानी बुध, गुरु, चतुर्थस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंत नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मात्र आरोग्याच्या काही समस्या यादरम्यान जाणवत रहातील. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, तृतीयस्थानी मंगळ, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल आहेत. मात्र अॅसिडिटी/ मायग्रेन तसेच पोटासंबंधी काही त्रास असतील तर आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. राजकारणी लोकांना मनासारखं यश शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, हर्षल आणि व्ययस्थानात बुध, गुरु, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताहाचा मध्य लाभदायक आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. खेळाडू विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. उपासनेसाठी किंवा धार्मिक गोष्टींसाठीही हा कालावधी चांगला ठरणार आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर प्रतिकूल काळ आहे. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, हर्षल आणि लाभस्थानात बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कला/ कौशल्याला वाव मिळेल. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभही होतील. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आरोग्य सांभाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, हर्षल, दशमस्थानात बुध, गुरु आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात उत्तम घटनांनी होऊ शकेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. निरनिराळे लाभ होतील. मात्र तुमच्या बोलण्यामुळे यादरम्यान लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. सप्ताह मध्य संमिश्र आहे. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. मात्र भावंडांशी या काळात वाद टाळा तसेच सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. परदेशप्रवास ज्यांना करायचा आहे त्यांना मात्र हा कालावधी चांगला ठरु शकेल. सप्ताह अखेर मनाला दिलासा देणार्या घटना घडतील. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थांना यश मिळेल मात्र थोडे कष्ट अधिक घ्यावे लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, हर्षल, भाग्यस्थानात बुध, गुरु आणि लाभस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. वैहाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. कलाकारांनाही चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा यादरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, हर्षल, अष्टमस्थानात बुध, गुरु आणि दशमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत छान खरेदी होऊ शकेल. खर्च या काळात वाढणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदाही यादरम्यान शक्य. मनोरंजनाकडे कल राहील. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. विवाहोत्सूकांना चांगले स्थळ यादरम्यान चालून येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी सूर्य, हर्षल, सप्तमस्थानात बुध, गुरु आणि नवमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंतचा काळ आनंददायक आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. लोकांचे सहकार्य मिळेल. धनलाभाचे योग शक्य आहेत. त्यानंतरचे दोन दिवस खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता असेल. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपासनेत मन रमवा. सप्ताह मध्यात कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल मात्र डोळे किंवा दात यांच्या काही समस्या जाणवू शकतील. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, हर्षल, षष्ठस्थानी बुध, गुरु आणि अष्टमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंतचा काळ उत्तम असेल. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायिकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. घरात छान वातावरण असेल. मन प्रसन्न राहील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठीही कालावधी अनुकूल आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. काही लाभ होतील. मात्र या काळात एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. जोखीम असलेली कामे आज करु नका. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन रमेल. यादरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. नृत्यकलाकारांसाठी छान ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, हर्षल, पंचमस्थानात बुध, गुरु, सप्तमस्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात भरपूर व चांगले काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. आर्थिक सुयश लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. सप्ताह अखेरीस जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, गुरु, षष्ठस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुध व गुरुची युती होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीची मदत किंवा मार्गदर्शन या काळात मिळू शकेल. धनलाभ अपेक्षित असेल तर त्यासाठी थोडे अधिक परीश्रम करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ होण्याचे योग आहेत. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)