अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ जून ते ७ जून २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध, हर्षल, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात व नंतर नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. वकीलांनाही हा कालावधी चांगला आहे. मात्र आपल्या आरोग्याच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, हर्षल, धनस्थानी गुरु, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी भावंडांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही काहींना संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामास प्राधान्य द्या. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल काळ आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अतिशय चांगला काळ आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह अखेरीस वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच फिजिकल फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांना कालावधी चांगला आहे. मात्र या काळात तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात मंगळ, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. रविवारी आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत. नंतरचे दोन दिवस आप्तेष्टांशी मतभेद टाळा. शेजार्यांचे विचित्र अनुभव शक्य आहेत. प्रवासात अडचणी किंवा त्रासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवा. प्रकाशक/ लेखक यांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताहाच्या मध्यात ज्यांना परदेशात शिकायला जायचे आहे त्यांच्यासाठी काही संधी चालून येतील. धार्मिक कार्यामध्ये मन रमेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी मात्र प्रतिकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. कलाकारांना विशेष अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध, हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. धनलाभ होईल. नातलगांचा किंवा मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींना प्रवास योग आहेत. सप्ताह मध्यानंतर तुमच्या उत्तम तांत्रिक कौशल्यामुळे किंवा कुशल नियोजनामुळे उत्तम यश मिळू शकेल. कागदपत्रांसंबंधी कामे व्यवस्थित पार पाडू शकाल. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारच्या दिवशी अचानक काही खर्च करावे लागतील. मनाला काही गोष्टींची काळजी वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस व्यावसयिकांना लाभदायक असतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह मध्यात कुटुंबियांबरोबर वेळ मजेत जाईल. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल.
उपासना: या काळात विठ्ठलाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, हर्षल, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. मनोरंजनाकडे कल राहील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट करु या काळात करु नका. सप्ताह मध्यात भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोगही शक्य. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र या काळात बोलण्यावर संयम ठेवावा. तुमच्या बोलण्यामुळे किंवा शाब्दिक कोट्यांमुळे लोक दुखावले जाऊ शकतील. काळजी घ्यावी.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. वरीष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. नोकरी/ व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थीत मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र पैशांची कामे लांबू शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. अती महत्वाकांक्षा या काळात टाळा अन्यथा संकटात पडण्याची शक्यता आहे. जोखीम असलेली कोणतीही कामे या दरम्यान करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. वैवाहिक सौख्य मिळेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू,
पंचमस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, अष्टमस्थानात गुरु, नवमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. वैहाहिक सौख्य मिळेल. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना चांगला फायदा या काळात होऊ शकेल. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. छान खरेदीचे योग येतील. मात्र या काळात तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवत रहातील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. आपली एखादी वस्तू गहाळ होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी सूर्य, बुध, हर्षल, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानी मंगळ आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा कल असेल. अचानक धनलाभाचेही योग शक्य आहेत. मात्र जोखीम असलेली कामे टाळा आणि वाहने सावकाश चालवा. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. या काळात वरीष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. तब्येतीची काळजी घ्यावी. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या चांगले काम होईल. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. मात्र तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. मन आनंदी असेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात मंगळ आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वाहने हळू चालवावी. रागावर नियंत्रण ठेवावे. याच काळात ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रेकी, अध्यात्म अशा गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचेही योग शक्य. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. घरात छान वातावरण असेल. आपल्या जिवलग माणसांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि, राहू, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, हर्षल, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरात आनंदी वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. अचानक धनलाभाचेही योग शक्य आहे मात्र जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताह अखेर अनुकूल ग्रहमान आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला बुधाचा मंगळाशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध मिथुन तर मंगळ सिंह राशित प्रवेश करेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. मात्र या दरम्यान मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताह मध्य तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वादग्रस्त होईल असं लेखन या दरम्यान सोशल मिडियावर करु नका. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. कार्यालयीन कामांसाठी प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमच्या चांगल्या नियोजनामुळे या काळात कौतुकास पात्र व्हाल. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. अचानक धनलाभाचे योग संभवतात मात्र जोखीम असलेल्या कामांपासून या काळात लांब रहावे.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)