साप्ताहिक राशिभविष्य

अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ मे ते १७ मे २०२५)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा काळ लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. छान खरेदी होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. भागीदारीत व्यवसाय असणारे तसेच आयात-निर्यात करणार्‍यांनी सध्या सावधगीरीने व्यवहार करावेत. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवावीत. कोणतेही जोखीम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला असेल. काहींना मात्र अचानक धनलाभ शक्य. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग येतील. वरीष्ठांची मर्जी राहिल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांची नाराजी होईल असे वर्तन टाळा. गुंतवणूक करत असाल तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, लाभस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवत रहातील. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. संशोधक, ज्योतिषी, अध्यात्म मार्गातील साधक यांच्यासाठी हा काळ विशेष यशाचा ठरु शकेल. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला असेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, दशमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकूल आहेत. मात्र अ‍ॅसिडिटी/ पोटासंबंधी ज्यांना काही त्रास असतील त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर आपल्या आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात भाग घ्याल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस, पदोन्नती, धनलाभ किंवा वरीष्ठांकडून मिळालेली शाबासकी सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. खेळाडूंना हा काळ विशेष यश देणारा ठरु शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. मधूमेह असणार्‍यांनी या काळात योग्य त्ते पथ्यपाणी सांभाळले पाहिजे. वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानी प्लूटो, अष्टमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कलाकौशल्याला वाव मिळेल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. तसेच संशोधक, डेटा अ‍ॅनालिस्ट, इतिहासकार, खाणकाम संबंधीत अभियंते यांच्यासाठी हा कालावधी चांगला ठरु शकेल. मात्र या काळात वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर करु नका. प्रवासातही योग्य ती काळाजी घ्या. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवा. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
सप्ताहाच्या शेवटी कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीची काळजी घ्या आणि जोडीदाराबरोबर वाद टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात चांगल्या घटनांनी होईल. काहींना लाभ होऊ शकतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मन प्रसन्न असेल. विवाहोत्सुकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर शेअर केलेल्या एखाद्या पोस्टमुळे प्रसिध्दी किंवा काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर त्याला गती देवू शकाल. सप्ताह अखेर लाभदायक ग्रहमान आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शुक्र, शनि, राहू, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. नोकरी मिळविण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. मात्र यादरम्यान कोणाशीही वाद ओढवून घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. तसेच या काळात कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवरही लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. मात्र वादग्रस्त होईल असं लेखन या दरम्यान सोशल मिडियावर करु नका. प्रवास करणार असाल तर योग्य ती काळजी जरुर घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: ’’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, पंचमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. नृत्यकलेशी संबंधीत असणार्‍यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभही होतील. उपासनेत मन लागेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. गुरुकृपा लाभेल. सप्ताहाच्या अखेरीस उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहेत. मन आनंदी व उत्साही राहील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानी मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. या काळात केलेले प्रवासही फायदेशीर ठरतील. सप्ताह मध्यात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील. प्रवास करणार असाल तर योग्य ती काळजी आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहे. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, तृतीयस्थानी शुक्र, शनि, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादा छंद किंवा एखादी हौस पुरवून घ्याल. सप्ताह मध्यानंतर उधारी वसूल होईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होतील. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग या काळात शक्य. लाभदायक घटनांचा काळ आहे. सप्ताह मध्यात वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र कोणत्याही वादापासून लांब रहा. अती दगदग टाळा. तसेच तब्येतीची काळजी घेणे या काळात आवश्यक आहे. अ‍ॅसिडिटी, पोटाचे काही त्रास असतील तर योग्य ते पथ्य आवश्यक आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांशी/ नातेवाईकांशी संपर्क साधाल. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस अचानक काही खर्च करावे लागतील. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, राहू, नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू आणि लाभस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला गुरु मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. धनलाभ अपेक्षित असतील तर त्यासाठी २/३ दिवस थांबावे लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)