अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ एप्रिल ते १२ एप्रिल २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टी खरेदी किंवा विकण्यासाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाचा मध्यात तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थी व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी कायदेविषयक कामांसाठी अनुकूल काळ आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही नवीन संधी मिळू शकतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. या काळात तुमच्या तब्येतीची मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो आणि लाभस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. तुमच्या हातुन काहीतरी छान काम होईल. लोकांच्या कौतुकाला पात्र व्हाल. सप्ताह मध्यात लाभ देणारं ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिकांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. परदेशात शिक्षणासाठी जायचे असेल तर त्यासंबंधी माहिती मिळविणे किंवा परदेशात कायमच्या निवासासाठी अर्ज करावयाचा असेल तर त्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वेळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. चमचमीत पदार्थ खायला तुम्हाला नेहमीच आवडतं. एखाद्या खाऊगल्लीला कुटुंबीयांसमवेत जरुर भेट द्या. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडीलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. साहित्यिक/ लेखकांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. एखादा धनलाभ प्रलंबित असेल तर त्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्यात कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आपल्या आवडीच्या पदार्थांवर मस्त ताव माराल. मात्र खाण्यापिण्यावर थोडा संयम या काळात बाळगायला हवा तसेच डोळ्यांची काळजी या काळात घ्यावी. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादा धनलाभ किंवा एखादं बक्षिस मिळण्याचे योग आहे. कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग संभवतो.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानी प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. मनात विनाकारण कोणत्यातरी चिंता येत रहातील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कोणतीही कामे करु नका. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाचे निर्णय २/३ दिवस पुढे ढकलावेत. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धन करणारा कालावधी आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. लांबच्या प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात काही खर्च अचानक सामोरे येतील. खरेदीसाठी तसेच परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. बाकी विमा व्यावसायिक, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना हाच कालावधी फयदेशीर ठरणार आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात ग्रहांची अनुकूलता अजूनच वाढणार आहे. काहींचा मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळेल. जोडीदारासाठी काही खरेदी कराल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. खेळाडूंना हा काळ विशेष यशाचा असेल. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. कोणाचे आर्थिक येणे असेल तर त्यात विलंब किंवा अडथळे संभवतात. कोणाशी वाद होणार नाहीत याची या काळात तुम्ही काळजी घ्यायला हवी. तुमच्या तब्येतीची काळजी घेणेही आवश्यक आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानी मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाचा तोल जाऊ देऊ नका. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्यात कौटुंबीक सौख्य मिळेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे योगही या दरम्यान शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. मानसन्मान मिळेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. लाभदायक काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. मस्त पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. संशोधक, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. काहींना या काळात भावी आयुष्याबाबत सूचक स्वप्ने पडतील किंवा शुभ संकेत जाणवायला लागतील. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. धार्मिक गोष्टीत मन रमेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा कालावधी अनुकूल आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या कला/ कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. मन आनंदी व उत्साही राहील. भागीदरीत व्यवसाय करणार्यांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करु नका. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. ज्योतिषी/ विमा व्यवसायिकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र(व), शनि, राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू आणि लाभस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि शुक्र व शनिची युती होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर शुक्र, शनि व बुधाशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग आणि गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वकील, फार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. भाग्यवर्धक घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)