अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शुक्र, शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरुवातीला तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला चांगली साथ देणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संपर्क साधाल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. प्रॉपटीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर काहींना अचानक धनलाभ संभवतात. तुमचं कौतुक या काळात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना कमी श्रमात जास्त यश देणारं ग्रहमान आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना सुसंधी प्राप्त होईल.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी धनस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी मंगळ(व), पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शुक्र, शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.

फ़लादेश– फलादेश- संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला आर्थिक स्थिती चांगली असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र तुमच्या बोलण्यामुळे यादरम्यान लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. लेखक, प्रकाशक, वक्ते यांना ग्रहमान अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. नवनवीन कल्पना सुचतील. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळणार आहे. धार्मिक गोष्टी मनाला समाधन देतील. सप्ताहाच्या शेवटी बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ(व), चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शुक्र, शनि, दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरुवातीला मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात धनलाभाचे काही योग संभवतात. कुटुंबीयांबरोबर वेळ छान व्यतीत कराल. मनोरंजनाकडे कल राहील. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला आवडते. या काळात तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम या दरम्यान मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतरचा काळ मात्र सावधानता बाळगायला सांगत आहे. वाहने जपून चालवा. जोखीम असलेल्या गोष्टी या काळात कटाक्षाने टाळाव्यात. सोशल मिडीयावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होऊ देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ(व), तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शुक्र, शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. चांगली खरेदी होईल. मनोरंजनाकडे कल राहील. कर्जफेडीसाठी हा कालावधी चांगला आहे. मात्र या काळात तुमचे आरोग्य सांभाळा. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. मात्र यादरम्यान लोकांशी व्यवहार करतांना तसेच सोशल मिडियावर काही शेअर करतांना योग्य ती काळजी जरुर घ्या.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात शुक्र, शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींशी किंवा आप्तेष्टांशी संपर्क होईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्य थोडासा प्रतिकूल असेल. काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. मनाचा तोल जाणार नाही याची या काळात काळजी घ्यावी. मेडीटेशन/ धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवलेले चांगले ठरेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. संपूर्ण सप्ताहात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शुक्र, शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. व्यावसायिकांचे प्रलंबीत असलेले निर्णय मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह अखेर खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. खरेदीसाठी मात्र चांगला सूर लागू शकेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला सूर्य, बुध, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शुक्र, शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व), दशमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा वरीष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्र किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह अखेरीस खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता असेल. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपासनेत मन रमवा.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व), नवमस्थानात मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही आजार असतील तर अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवास लाभदायक ठरु शकतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. नोकरीत किंवा व्यवसायात कामाच्या तुलनेत मोबदला चांगला मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शुक्र, शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), अष्टमस्थानी मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती पुन्हा अनुकूल होत आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काही धनलाभही होतील.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शुक्र, शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानात मंगळ(व), नवमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अती दगदग टाळा. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच वकीलांना हा काळ चांगला ठरेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काहींना फ़ायदा मिळू शकेल. नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह मध्य चांगला आहे. आवडत्या लोकांबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांनाही अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतरचा काळ संमिश्र असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. विमा व्यावसायिक, ज्योतिषी, शास्त्रज्ञ यांना मात्र हा काळ विशेष फायद्याचं ठरु शकेल. अचानक धनलाभाचेही योग शक्य. सप्ताह अखेर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य, बुध, आणि व्ययस्थानात प्लूटो, अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाची सुरुवात उत्तम असणार आहे. एखादं बक्षिस, भेटवस्तू किंवा वरीष्ठांकडून मिळालेली कौतुकाची थाप आनंद देऊन जाईल. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारा कालावधी आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा यादरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. मात्र यादरम्यान तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह अखेर जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानी केतू, दशमात सूर्य, बुध, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शुक्र शनि अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल व चंद्राची मंगळाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा मंगळाशी प्रतियोग होईल. १७ चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल आणि शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ विशेष चागला आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. अती दगदग टाळावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)